Premachi Goshta Serial Update : हर्षवर्धनच्या जाळ्यात अडकणार सावनी, काय करणार सागर-मुक्ता; 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहणार?
Premachi Goshta Serial Update : हर्षवर्धन सावनीकडे आपल्याकडे कसे ओढतो, सागर-मुक्ता काय करणार या हे प्रेक्षकांना प्रेमाची गोष्ट मालिकेतील आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.
Premachi Goshta Serial Update : हर्षवर्धन फसवणूक करत असल्याचे सागर-मुक्ता सावनीला सांगतात. मात्र, सावनीचा विश्वास बसत नाही. त्यानंतर हे तिघेही हर्षवर्धनच्या घरी जातात. तेव्हा काय घडतं? रंगेहात पकडले गेल्यानंतरही हर्षवर्धन सावनीकडे आपल्याकडे कसे ओढतो, सागर-मुक्ता काय करणार या हे प्रेक्षकांना 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेतील आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.
हर्षवर्धनला रंगेहात पकडणार सावनी...
मुक्ता-सागरच्या म्हणण्यानुसार सावनी त्यांच्यासोबत हर्षवर्धनच्या घरी अचानकपणे जाते. त्यावेळी हर्षवर्धन दुसऱ्याच मुलीसोबत बेडरुम मध्ये असतो. तिला हर्षवर्धनच्या मिठीत पाहून सावनी चिडते आणि हर्षवर्धनला याचा जाब विचारते. त्यावर तू चुकीचा अर्थ काढत असल्याचे हर्षवर्धन सावनीला सांगतो.
कित्येक वेळी इच्छा नसतानाही मी तुझ्यासाठी पार्टीमध्ये आली. तू मला कधीही बायको मानले नाही. मात्र, तुला मी माझा नवरा समजले. तुझ्या सांगण्यावरून सगळ्या गोष्टी केल्या, आदित्यला हॉस्टेलला पाठवले.
हर्षवर्धन आपली बाजू सांभाळताना ही मुलगी वेडिंग प्लानर असल्याचे सांगते. मी आपल्या लग्नाचा प्लानिंग करत असल्याचे हर्षवर्धन सांगतो. सावनी हर्षवर्धनच्या बोलण्यावर भाळते आणि त्याच्यावर विश्वास ठेवते. सावनी आपल्यावर विश्वास ठेवत असल्याचे लक्षात आल्यानंतर हर्षवर्धनकडून थेट सागर-मुक्तावर आरोप सुरू होतात. मुक्तावर आरोप होत असल्याने सागर चिडतो आणि मुक्तावर आरोप करायचे नाही असे सांगतो. मी आतादेखील इकडे आदित्यसाठी आलो असल्याचे सांगतो. मला तुझ्यात आणि या सावनीमध्ये काहीच रस नसल्याचे सागर बजावतो.
हर्षवर्धनच्या जाळ्यात अडकणार सावनी ...
मुक्तादेखील हर्षवर्धनला उत्तर देते. आता सावनीला कितीही आमच्या घरीदेखील लग्नघाई आहे. वेडिंग प्लानर येतात पण ते बेडरुममध्ये येत नाही असे मुक्ता सांगते. त्यावरही हर्षवर्धन सावरासावर करतो आणि पुन्हा खोट बोलून सावनीवर भुरळ पाडण्याचा प्रयत्न करतो. सावनीदेखील हर्षवर्धनच्या जाळ्यात अडकते. सावनी हर्षवर्धनची माफी मागते. त्यावर हर्षवर्धन सावनीला वचन मागतो, मला कोणासोबत पाहिले, काही शंका आली तर माझ्याशी बोल. कोणाच्याही बोलण्यात येऊ नको. आपल्या नात्यात विश्वास नसेल तर याला काहीच अर्थ नाही. आपण इथेच थांबवूया असे हर्षवर्धन म्हणतो. सावनी हर्षवर्धनची माफी मागते. हर्षवर्धन सागरकडे पाहत बोलतो की मला माहीत आहे की सावनीला अजून विसरू शकला नाहीस. हर्षवर्धनचे हे बोलणं ऐकताच सागर संतापतो आणि म्हणतो की ही माझ्या मुलाची आई नसती तर मी सावनीचे तोंडही पाहिले नसते.
सावनीदेखील हर्षवर्धनच्या बाजूने बोलते. आता कोणीही प्रयत्न केले तरी आमचं लग्न तुम्ही मोडू शकणार नाही असे सावनी म्हणते. त्यावर मुक्ता तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करते. पण, सावनी तिचं काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते.
मुक्ताला सागर बजावणार
सागर-मुक्ता तिथून निघतात. तुमचा अतिचांगुलपणा आता तुमच्याकडेच ठेवा, तुम्ही खूपच चांगले आहात. सावनी तुमच्या चांगुलपणास पात्र नाही असे सागर मुक्ताला सांगतो. सावनीची काळजी करू नका, त्यांचा आपला काहीही संबंध नाही. आदित्यचं मी पाहतो असे सागर सांगतो.