एक्स्प्लोर

Premachi Goshta Serial Update : अखेर सागर मुक्ताला सत्य सांगणार, आदित्यला काय शिक्षा होणार?

Premachi Goshta Serial Update : सागर आता मुक्ताला आता माधवीच्या अपघाताचे सत्य सांगतो. हे सत्य लपवून ठेवल्याबद्दल मुक्ता आणि सागरमध्ये वाद होणार का? आता मुक्ता आणि माधवी आदित्यला काय शिक्षा देणार?

Premachi Goshta Serial Update :  'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेचा आजचा एपिसोड रंगतदार होणार आहे.सावनीचा डाव मुक्ता उधळून लावते. सागर  आता मुक्ताला आता माधवीच्या अपघाताचे सत्य सांगतो. हे सत्य लपवून ठेवल्याबद्दल मुक्ता आणि सागरमध्ये वाद होणार का? आता मुक्ता आणि माधवी आदित्यला काय शिक्षा देणार, याची उत्तरे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

सागर मुक्ताला सांगणार सत्य...

मुक्ता सागरला घरी आणते. सागरला मुक्ताला काहीतरी सांगायचे असते. पण,  मुक्ता त्याला आराम करायला सांगते. मात्र सागरला हट्टाला पेटतो आणि मला आताच तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे असे सांगतो. त्यावर मु्क्ता हर्षवर्धनने मला सांगितलेले खोटं आहे ना असे विचारते. सावनीने आईचा अपघात केलाय हे खोटं आहे ना असे मुक्ता सागरला विचारते. त्यावर सागर नकारार्थी उत्तर देतो. मुक्ता सुटकेचा नि:श्वास सोडते पण पुढच्याच क्षणी तो आईचा अपघात आदित्यने केला असल्याचे सांगतो. सागरच्या या उत्तराने मुक्ताला धक्का बसतो. 

मुक्ताला धक्का बसला असल्याचे लक्षात येताच सागर गयावया करतो. मुक्ता आणि आदित्य हे दूर होता कामा नये याची चिंता सागरला असते. सागर हात जोडून मुक्ताला समजावण्याचा प्रयत्न करतो. त्यावर मुक्ता आदित्यला पोलिसात देणार नसल्याचे सांगते. मात्र, आदित्यची चूक मोठी आहे हे लक्षात येतंय ना असे सागरला विचारते. आदित्यच्या भविष्यासाठी हे चुकीचे आहे असे मुक्ता सांगते. एक वडील म्हणून तुम्हाला त्याला चांगलं वळण लावणं गरजेचं आहे. आत्ताच खरी वेळ आहे की आदित्यला तुम्ही त्याच्या चुकांची जाणीव करून देऊ शकता  असे मुक्ता सागरला सांगते. सागरला ही गोष्ट पटते. आदित्यला आपल्या चुकीची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे सागर मुक्ताला सांगतो. एक बाप म्हणून मी कर्तव्य पार पाडणार असून मी आदित्यला पुन्हा योग्य वळणावर आणणार. पण, मला यात तुमची गरज लागणार असल्याचे सागर म्हणतो. मुक्ताही आदित्यसाठी मदत करणार असल्याचे सांगते. 

सावनीची होणार चिडचिड...

आपला डाव फसल्याने सावनीची चिडचिड होते. एवढं समोर असूनही मुक्ताचा सागरवर विश्वास कसं काय असे हर्षवर्धनला सांगते. त्यावर हर्षवर्धन सावनीला तुझे डाव नेहमीच फसतात असे सांगतो. आता आदित्य हाच तुझा शेवटचा पत्ता असून  त्याला काही होता कामा नये असे हर्षवर्धन सांगतो.

सागर सावनीला सुनावणार, आदित्यला सोबत नेणार...

दुसऱ्या दिवशी सागर सावनीच्या घरी जातो. रात्री झालेल्या प्रकारावर सागर सावनीला सुनावतो. आदित्य फक्त तुझाच मुलगा नाही तर माझाही मुलगा आहे असे सावनी सांगते. त्यावर सागर सावनीला सडेतोड उत्तर देतो. त्याला हवं तेव्हा हॉस्टेलमध्ये टाकतेस आणि मला इमोशनल ब्लॅकमेल करायचं असेल तेव्हा त्याला घेऊन येतेस. एक वस्तू म्हणून तू आदित्यचा वापर करतेस.  आता तुझी ही नाटकं बस झाली. आता आदित्यच्या बाबतीतले सगळे निर्णय मी घेणार.

आदित्यला तो सोबत येण्यास सांगतो. चिडलेला सागर पाहून आदित्य घाबरतो. सागरच्या पाया पडतो आणि  मला जेलमध्ये देऊ नका पप्पा मला तिथे जायचं नाही असे म्हणतो. यावर सागर त्याला धीर देत म्हणतो तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मग माझ्यासोबत चल.

माधवीला कळणार सत्य, आदित्यला शिक्षा मिळणार?

मुक्ता आपल्या आईकडे माधवीकडे जाते. अपराधी आपल्या घरातील असेल तर त्याला शिक्षा द्यायची का? असे विचारते. त्यावर माधवी आणि पुरू अपराधी घरातील असेल तर आपण त्याला नीट समजावून सांगावे. आपल्या माणसांसोबत जिंकण महत्त्वाचे असते. त्यांच्यासोबत जिंकून आपल्याला काही मिळत नाही असे माधवी-पुरू सांगतात. सत्य किंवा असत्य जिंकत नसतात तर नाती जिंकत असतात असे सागर सांगतो. 

मुक्तासोबत सागरही तिथे आलेला असतो. प्रत्येक वेळी माफी हा  उपाय नसतो. मग ते आपल्या नात्याबाबतीत असले तरीही. माधवी सागर-मुक्ताला काय झालंय हे विचारते. त्यावर सागर म्हणतो की,  आई, तो अपघात तुमच्या जीवावरही बेतू शकला असता किंवा तुम्हाला गंभीर डॅमेजही झालं असते. माधवी कोणी अपघात केला हे विचारते. त्यावर सागर म्हणतो की, तुमचा अपघात ज्याने केला त्याला काय शिक्षा द्यायची हे तुम्ही ठरवा. ऐरवी मी त्याचे हालहाल केले असते. पण मी प्रेम आणि कर्तव्य यात अडकलो आहे. सागरचे हे बोलणं ऐकून माधवी विचारात पडते आणि गुन्हेगार परिचित आहे का , असे सागरला विचारते. त्यावर सागर इकडं ये रे असे म्हणतो आणि माधवी-पुरुसमोर आदित्य येतो. आदित्यला पाहून माधवीला धक्काच बसतो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget