एक्स्प्लोर

Premachi Goshta Serial Update : हर्षवर्धनकडून मुक्ताचे कान भरण्याचा प्रयत्न, सागर करणार स्वत:लाच शिक्षा

Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आता सागर काय करणार, मुक्ताला सत्य सांगणार का, या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहे.

Premachi Goshta Serial Update :  आदित्यच्या चुकीमुळे माधवीचा अपघात झाल्यानंतर सागरच्या आयुष्यात आता संकटाची मालिका सुरू झाली आहे. मुक्ताचा आपण विश्वासघात करत असल्याची भावना त्याच्या मनात प्रबळ होत चालली आहे. त्यातून तो स्वत:ला शिक्षा करतो. तर, दुसरीकडे मुक्ता माधवीचा अपघात करणाऱ्या दोषीच्या शोधासाठी प्रयत्न करत आहे. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत आता सागर काय करणार, मुक्ताला सत्य सांगणार का, या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहे. 

हर्षवर्धनकडून मुक्ताचे कान भरण्याचे प्रयत्न 

हर्षवर्धन मुक्ताला भेटण्यासाठी तिच्या क्लिनिकमध्ये जातो. मुक्ताला याचा धक्का बसतो. हर्षवर्धन मुक्ताला सागर विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत असतो. तुझा नवरा सागर आणि माझी सावनी या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याचे हर्षवर्धन सांगतो. सागर सतत काही ना काही कारण काढून सावनीला भेटण्याचा प्रयत्न करतोय. त्याला समजावून सांगे असं हर्षवर्धन मुक्ताला धमकावण्याच्या सुरात सांगतो. त्यावर मुक्ता त्याला हात खाली घ्यायचा आणि हे माझं क्लिनिक आहे असे सांगते. माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास असल्याचेही पुढे मुक्ता सांगते. मला भडकवणारे तुम्ही कोण? मी एवढ्या हलक्या कानाची नाही की तुम्ही मला काहीही सांगाल आणि मी तुमच्यावर लगेच विश्वास ठेवेन असे मुक्ता हर्षवर्धनला सुनावते. हर्षवर्धन मुक्ताला वारंवार सागर-सावनीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतो. पण मुक्ता ऐकून घेण्याच्या तयारीत नसते.

सागर खरेदी करणार सीसीटीव्ही फूटेज

मुक्ताच्या विश्वासाला तडा देत असल्याची बाब सागरच्या मनाला बोचत असते. सागर सावनीसोबत सीसीटीव्ही फूटेज घेण्यासाठी त्या दुकानाच्या मालकाकडे जातात. सावनी तिथेही सागरसोबत हुज्जत घालते. मुक्ताच्या हाती सीसीटीव्ही फूटेज गेले असते तर आदित्य तुरुंगात गेला असता असे सांगते. त्यावर सावनीवर सागर भडकतो. तुलाच तुरुंगात जायला हवं, लहान मुलाच्या हाती गाडीचे स्टिअरिंग कसे दिले असा जाब सागर सावनीला विचारतो. 

सागरच्या मनाला बोचतेय विश्वासघाताची बाब

मुक्ता सागरला फोन करून अपघात करणारी कारची माहिती मिळाली असल्याचे सांगते. ही बाब समजताच सागरची चिंता वाढते. अपघातानंतर कार दुरुस्तीला गेली होती का, असे सागर सावनीला विचारतो. त्यावर सावनी होकारार्थी उत्तर देते. सागर त्यावरून पुन्हा सावनीवरून चिडतो आणि कारची माहिती मिहिर, मुक्ताला समजली असल्याचे सांगतो.

सागर करणार स्वत:ला शिक्षा

सागर पुन्हा मुक्ताशी खोटं बोलतो. घरी आल्यावर सागर सांगतो की त्यांना काहीच कल्पना नाही. त्या कारबद्दल ते विसरले असल्याचे सांगतो. हे ऐकून मुक्ता-मिहिरला धक्का बसतो. पण, सागरने त्या गॅरेज मालकाला पैसे देऊन तोंड न उघडण्यास सांगितले. मुक्ताशी वारंवार खोटं बोलत असल्याची बाब सागरला खूपच बोचत असते. चिडून तो स्वत:च्या कानशिलात लगावत असतो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
Embed widget