एक्स्प्लोर

Premachi Goshta Latest Episode : सागर-मुक्ताच्या मनात आता फुलणार प्रेमाची गोष्ट, इंद्रा करणार पुन्हा गैरसमज

Premachi Goshta Latest Episode : मालिकेच्या आजच्या भागात सागर-मुक्तामधील प्रेमाची सुरुवात होताना दिसणार आहे. तर, दुसरीकडे इंद्राच्या मनात मुक्ताबद्दल अडी कायम असल्याचे दिसून येते.

Premachi Goshta Latest Episode :  'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेत आजच्या एपिसोडमध्ये सागर-मुक्तामध्ये प्रेम फुलणार आहे. मुक्ताच्या निस्वार्थीपणाचे सागर कौतुक वाटते. मुक्तावर विश्वास ठेवायला हवा होता, असे सागरला वाटते. मालिकेच्या आजच्या भागात सागर-मुक्तामधील प्रेमाची सुरुवात होताना दिसणार आहे. तर, दुसरीकडे इंद्राच्या मनात मुक्ताबद्दल अडी कायम असल्याचे दिसून येते.

घरातील वाद संपवल्यानंतर सागर सावनीच्या घरी जाब विचारण्यासाठी जातो.  सईच्या मोबाईलवर सावनीचा कॉल पाहून सागर हा सावनीच्या घरी जातो. त्यावेळी अचानकपणे आलेल्या सागरला पाहून आदित्य आणि सावनीला धक्का बसतो. आदित्य रागावून निघून जातो. त्यानंतर सावनी सागरला कोळी कुटुंबात झालेल्या भांडणावरून टोमणे देत बरेच उलटसुलट बोलते. त्यावर सागर सावनीला सुनावतो आणि बायकोची जागा मुक्ताने घेतली असल्याचे सांगतो. तू घर तोडतेस आणि मुक्ता घर जोडते असे सुनावतो. सागर सावनीला आरसा दाखवतो आणि तुझी मुक्तासोबत बरोबरी करू शकत नाही. मुक्ता आमच्या घरची सून झाली आहे. घर हे देऊळ असेल तर मुक्ता त्याचा कळस होत असल्याचे सागर सांगतो. मला सोडून गेल्याने मला मुक्तासारखी बायको मिळाली असल्याचे सागर सांगतो आणि तिला धन्यवाद देतो.

सागरच्या या आक्रमक पवित्र्याने सावनी बिथरते आणि ती सागरवर प्रतिहल्ला करते. सावनीदेखील सागरला मुक्तासोबत असलेल्या संबंधावरून सुनावते. माझे आणि हर्षवर्धनचे प्रेम आहे. आम्ही नवरा बायको नसलो तरी आमच्यात प्रेम आहे. तुमच्या नात्यात प्रेम नाही तर जबाबदाऱ्या आहेत. नवरा बायको असले तरी तुमच्यात फक्त प्रेम असल्याचे सावनी सांगते.

सागर-मुक्तामध्ये फुलणार प्रेम

अचानक सागर कुठं गेला याचा विचार मुक्ता करत असते. तेवढ्यात  सागर घरी येतो. त्यावेळी मुक्ताकडे पाहून सागर मनात माणूस खरंच इतका निस्वार्थ असू शकतो का असा विचार करतो. 
सागर मुक्ताची माफी मागतो आणि विश्वास ठेवायला हवा होता असे म्हणतो.आता पर्यंत ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी दगा दिला असल्याचे सांगतो. त्यामुळे विश्वास ठेवायला भिती वाटते. तुमच्यावरही विश्वास ठेवू शकलो नाही असे सागर मुक्ताला सांगतो. यावेळी सागर भावूक होतो. मु्क्तादेखील सागरकडे आपले मन मोकळं करते. स्वाती-कार्तिकची अडचण सांगायचे असते. पण नाही सांगता आली असे मुक्ता सांगते. आपण एकत्र अडचण सोडवली असती असे मुक्ता सांगते. नात्यात विश्वासाला महत्त्व असते, त्याला तडा जाऊ देऊ नका असे मुक्ता विश्वास सांगते.  यावेळी दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन विश्वास ठेवण्याचा शब्द देतात. 

इंद्रा पुन्हा करणार गैरसमज 

सईला मुक्ता दात घासण्यास सांगते आणि बेडरुममध्ये जाते. त्यावेळी इंद्रा येत आणि सईला लाडू खाण्याचा आग्रह करते. त्यावेळी सई नकार देते. इंद्राला गैरसमज होतो. ती मुक्ताला बोल लावते. त्यावर सई नाराज होते आणि इंद्राला रात्री झालेल्या भांडणावरून बोलते. इंद्राला वाटते की मुक्तानेच सईला सांगते. यावरून इंद्रा संतापते. मुक्ता गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते. आपण सईला दात घासल्यानंतर खाण्यास सांगितले असल्याचे सांगते. मात्र, इंद्रा आपल्या म्हणण्यावर ठाम राहते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडलेABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Embed widget