Premachi Goshta Latest Episode : रिझल्टमध्ये झोल? मुक्ताच्या प्रश्नावर लकी चिडणार; हर्षवर्धन सावनीला देणार कानमंत्र
Premachi Goshta Latest Episode : मुक्ताच्या होकाराने आपला डाव उधळला जाणार असल्याने सावनीचा जळफळाट होतो. तर, दुसरीकडे हर्षवर्धन सावनीला कानमंत्र देतो. आजच्या एपिसोडमध्ये काय होणार?
Premachi Goshta Latest Episode : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेतील आजच्या एपिसोडमध्ये मुक्ता आणि सागरमधील भावनिक बंध आणखी घट्ट होताना दिसणार आहेत. मुक्ताच्या होकाराने आपला डाव उधळला जाणार असल्याने सावनीचा जळफळाट होतो. तर, दुसरीकडे हर्षवर्धन सावनीला कानमंत्र देतो.
मुक्ताचे होणार कौतुक
सागरच्या कंपनीचे नवे प्रोडक्ट हे फक्त पुरुषांसाठी न ठेवता स्त्रीयांसाठी देखील असावे अशी सूचना मुक्ता करते. मुक्ताची सूचना संचालक मंडळाला आवडते आणि त्यावर विचार करण्याचे आश्वासन देतात. मुक्ताने दिलेल्या सूचनेवर सागरला कौतुक वाटते. तर, दुसरीकडे सावनीचा चांगलाच जळफळाट होतो.
लकी मुक्तावर चिडणार
लकी सागरला मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्यासाठी पैसे मागतो. त्यावर मुक्ता लकीला तू अभ्यास कसा केला, कधी अभ्यास करतानादेखील दिसला नाहीस, हे सगळं कसे मॅनेज असे विचारते. त्यावर लकी मुक्तावर चिडतो आणि माझ्यावर संशय आहे का असे विचारतो. सागर दादाला पैसे मागितले म्हणून राग आला का, आम्हा भावांच्या मध्ये बोलत जाऊ नकोस असे लकी मुक्ताला म्हणतो. त्यावर सागर हस्तक्षेप करून लकीचा गैरसमज दूर करतो.
सावनी ऑफिसमध्ये आल्याचे सागर घरी सांगतो. त्यावर इंद्रा चिडते. सागर ऑफिसमध्ये काय काय घडले हे सगळे सांगतो आणि मुक्ता कंपनीच्या नव्या प्रोडक्टची मॉडेल असल्याचे सांगतो. इंद्रासह सगळेचजण मुक्ताचे कौतुक करतात.
लकीच्या वागण्याबाबत सागर आणि मुक्ता चर्चा करतात. लकीमध्ये झालेला बदल मुक्ता सांगते. त्यावर सागर तिची समजूत काढतो आणि घरातील सदस्यांचा विचार करत असल्याबद्दल आभार मानतो.
सावनीचा जळफळाट
मुक्ताचे झालेले कौतुक पाहुन सावनीचा जळफळाट होतो. हर्षवर्धनला सगळा प्रसंग सावनी सांगते. त्यावर हर्षवर्धन तिला तुझी लढाई तू लढ असे सांगतो आणि भूतकाळात तिने कशाप्रकारे इतरांवर प्रभाव टाकून आपल्या बाजूने लोकांना वळवले हे सांगतो. त्यावर सावनी हर्षवर्धनचे आभार मानते.
पाहा व्हिडीओ : Premachi Goshta | Latest Episode 168 |