एक्स्प्लोर

'रंग माझा वेगळा’ मालिकेत होणार 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री!

स्टार प्रवाहवरील 'रंग माझा वेगळा' मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अशातच आता या मालिकेत अभिज्ञा भावेची एन्ट्री होणार आहे. तनुजा भारद्वाज असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तनुजाच्या येण्याने कथानकातही नवं वळण येणार आहे.

मुंबई : अभिज्ञा भावे ही अभिनेत्री गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या माध्यमांत काम करते आहे. आधी ती नाटकात होती. त्यातून पुढे ती मालिकेत आली. सुबोध भावेच्या 'तुला पाहते रे' मालिकेत तिच्या कामाची तारीफ झाली. पुढे तिने पुन्हा एकदा नाटक केलं. त्यात सुनील बर्वे, मयुरी देशमुख यांच्या भूमिका होत्या. त्या नाटकाचं नाव होतं 'तिसरे बादशाह हम'. आता अभिज्ञा पुन्हा एकदा टीव्हीवर यायला सज्ज झाली आहे.

स्टार प्रवाहवरील 'रंग माझा वेगळा' मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. लवकरच या मालिकेत अभिज्ञा भावेची एन्ट्री होणार आहे. तनुजा भारद्वाज असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तनुजाच्या येण्याने कथानकातही नवं वळण येणार आहे. कार्तिक आणि तनुजा कॉलेज फ्रेण्ड्स. मात्र कॉलेजनंतर या दोघांची भेट कधी झाली नाही. आता मात्र एका अपघातानेच या दोघांची भेट घडवून आणली आहे. तनुजाच्या येण्याने मालिकेच्या कथानकात कोणता नवा ट्विस्ट येणार हे पहाणं देखिल उत्सुकतेचं असणार आहे.

एकीकडे सौंदर्या काळ्या रंगाचा द्वेष का करते? या गोष्टीचा छडा लावण्यासाठी दीपा कार्तिक जीवाचं रान करत आहेत. अशातच तनुजाच्या येण्याने हा गुंता वाढणार की, सुटणार या प्रश्नांची उत्तरं रंग माझा वेगळाच्या पुढील भागांमधून लवकरच उलगडतील. अभिज्ञाची या मालिकेतली भूमिकाही तितकीच रंजक असणार आहे. तिच्या आगमनाचा ट्रॅक पाहता आता ती या मालिकेला आणखी गती तर देईलच शिवाय, कथानकालाही नवं वळण मिळेल यात शंका नाही.

लॉकडाऊननंतर नव्याने सुरू झालेल्या मालिकांमध्ये स्टार प्रवाह पुन्हा एकदा नंबर वनवर आलं आहे. त्यातच रंग माझा वेगळा ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असल्याचं बार्कने सांगितलं आहे. त्यानुसार आता नंबर 1 च्या क्रमवारीत असलेल्या मालिकेत अभिज्ञा असण्याने या मालिकेला फायदाच होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Embed widget