Phulala Sugandh Maticha : 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेच्या कलाकारांचा पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार; प्लास्टिक बाटल्यांचा 'असा' केला वापर
Phulala Sugandh Maticha : अभिनेत्री अदिती देशपांडे (Aditi Deshpande) यांच्या पुढाकाराने सेटवरच्या प्लास्टिक बाटल्यांचा टाकाऊ पासून टिकाऊ वापर करण्यात येत आहे.
Phulala Sugandh Maticha : निसर्गाने आपल्याला भरभरुन दिलंय. त्याचं हे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आता आपण सर्वांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. स्टार प्रवाहवरील (Star Pravah) फुलाला सुगंध मातीचा (Phulala Sugandh Maticha) मालिकेतील कलाकारांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतलाय. जीजी अक्का म्हणजेच अभिनेत्री अदिती देशपांडे (Aditi Deshpande) यांच्या पुढाकाराने सेटवरच्या प्लास्टिक बाटल्यांचा टाकाऊ पासून टिकाऊ वापर करण्यात येत आहे.
काय आहे कलाकारांचा उपक्रम?
सेटवर पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या एकत्र जमा केल्या जातात. अदिती ताई या रिकामी बाटल्या दादर मधली गल्ली येथील ग्रीन इनिशिएटीव्ह या संस्थेला देतात. या संस्थेमार्फत प्लास्टिकच्या या निरुपयोगी बाटल्यांपासून इंधन निर्मिती केली जाते किंवा बागेत सुशोभीकरणासाठी वापरल्या जातात. गेले वर्षभर अदितीताई हा उपक्रम सेटवर राबवत आहेत. अदिती ताईंच्या या उपक्रमाला फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील सर्वच कलाकार सहाय्य करत असून पर्यावरण रक्षणासाठी झटत आहेत. फुलाला सुगंध मातीचा मालिकेच्या सेटवरचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.
फुलाला सुगंध मातीचा या मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत समृद्धी केळकरने किर्ती ही भूमिका साकारली आहे. मालिकेतील किर्तीनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. तर निकीता पाटील, गिरीश ओक, हर्षद अतकरी या कलाकांनी या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येते. प्रेक्षक ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर पाहू शकतात.
हेही वाचा:
- Appi Amchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेच्या प्रोमोची चर्चा; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
- Bigg Boss Marathi 4 : चालतय की... राणादा खेळणार बिस बॉसच्या घरातील टास्क? हार्दिक जोशी असू शकतो पहिला स्पर्धक