Appi Amchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेच्या प्रोमोची चर्चा; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
कलेक्टर झालेल्या अप्पी (Appi Amchi Collector) नावाच्या एका मुलीची ही गोष्ट असणार आहे, असं प्रोमोमध्ये दिसत आहे.
Appi Amchi Collector : छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. विविध वाहिन्यांवरील मालिका प्रेक्षक आवडीनं बघतात. आता लवकरच झी-मराठी (Zee Marathi) या वाहिनीवर एक नवी मालिका प्रदर्शित होणार आहे. या मालिकेचं नाव 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Amchi Collector) असं आहे. या मालिकेचा प्रोमो झी-मराठी वाहिनीच्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. कलेक्टर झालेल्या अप्पी नावाच्या एका मुलीची ही गोष्ट असणार आहे, असं प्रोमोमध्ये दिसत आहे.
प्रोमोमध्ये दिसत आहे की, अपर्णा सुरेश माने ही कॉन्ट्रॅक्टरच्या कामाऐवजी आधी सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्याला महत्त्व देते. 'अडचणी सोडवण्यासाठी मी कलेक्टर झाले' हा अपर्णाचा डायलॉग अनेकांचे लक्ष वेधतो. प्रोमोमध्ये अपर्णाचे वडील देखील दिसत आहेत. ही मालिका 22 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
22 ऑगस्टपासून झी-मराठी या वाहिनीवर सोमवार ते शनिवार ही संध्याकाळी सात वाजता ही मालिका प्रेक्षक पाहू शकतात. श्वेता शिंदेच्या वज्र प्रॉडक्शन्सनं या मालिकेची निर्मिती केली आहे. वज्र प्रॉडक्शन्सनं लागिरं झालं, मिसेस मुख्यमंत्री आणि छोटी मालकीण या मालिकेंची देखील निर्मिती केली आहे.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
या नव्या मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस
'तू चालं पुढं', 'नवा गडी नवं राज्य', 'बस बाई बस', 'डान्स महाराष्ट्र डान्स', 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' या नव्या मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
हेही वाचा: