एक्स्प्लोर

Paaru : लग्नानंतर प्रसाद जवादेची नवी मालिका, अहिल्यादेवीच्या शिस्तबद्ध जगात, मनसोक्त जगणारी 'पारु' येणार; प्रोमो आऊट

Paaru : 'पारु' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो आऊट झाला असून प्रेक्षक आता मालिकेची प्रतीक्षा करत आहेत.

Paaru New Marathi Serial : छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या, विविध धाटणीच्या मालिका (Marathi Serials) सुरू आहेत. या मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरल्या आहेत. आता 'पारु' (Paaru) ही नवी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेचा प्रोमो आऊट झाला असून प्रेक्षक आता मालिकेची प्रतीक्षा करत आहेत. 

आपुलकीने वागणारी, मनसोक्त हसणारी, नितळ पारु

तिला आपण रानातली पारवळ म्हणू शकतो, मोराचं सतरंगी मोरपीस म्हणू शकतो, किंवा डोंगरातल्या वाहणाऱ्या झऱ्याचा मंजुळ नाद पण म्हणू शकतो. पारू काय नाही? तर पारू हे सगळं आहे. पारू खरंतर एक जग आहे. निरागस प्रेमाने भरलेली, उत्साहाने सळसळणारी, बारमाही वाहणाऱ्या नदीप्रमाणे खळखळत हसणारी, तुमच्या आमच्या प्रत्येकात दडलेली पारू. लवकरच पारु ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'पारु'चं कथानक काय? (Paaru Serial Story)

'पारु'ची गोष्ट आहे गावातून पहिल्यांदाच मोठ्या शहरात आलेल्या मुलीची. कित्येक वर्ष आपल्या वडिलांच्या पासून लांब राहिल्यानंतर आता वडिलांच्या सोबत राहायला शहरात आलेली पारू. गावावरून शहरात येताना पारू आपल्यासोबत गावाकडचं निरागसपणा घेऊन आली आहे. ती तिच्याबरोबर तिचा निसर्ग घेऊन आली आहे. 

शहराच्या वेगाची जाणीव नसणारी, इथल्या माणसांच्या स्वभावाचा अंदाज नसलेली, जे मनात आहेत ते ओठांवर असणारी पारू. या शहराचा वेग तिला पकडता येईल का? इथल्या माणसांच्या मनाचा तिला ठाव घेता येईल का? तिच्या हळव्या मनाला समजून घेणारं, तिच्या हक्काचं कुणीतरी तिला या शहरात भेटेला का?  हे सगळं आपल्याला या नवीन मालिकेत बघायला मिळेल.

View this post on Instagram
 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

शरयू सोनावणे दिसणार मुख्य भूमिकेत

'पारु' मालिकेचं पटकथा लेखन केलं आहे किरण कुलकर्णी यांनी तर संवाद लेखक इरफान मुजावर हे आहेत. मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत राजू सावंत. यात नटखट अवखळ निष्पाप पारूची भूमिका साकारणार आहे 'शरयू सोनावणे'. तिच्या सोबत प्रमुख भूमिकेत असतील प्रसाद जवादे, मुग्धा कर्णिक, अनुप साळुंखे हे कलाकारदेखील आहेत. प्रेक्षकांचं मनोरंजन करायला पारु आता सज्ज आहे. लग्नानंतर प्रसाद जवादेने पारु या मालिकेच्या माध्यमातून दमदार कमबॅक केलं आहे.

संबंधित बातम्या

Marathi Serials : जुई गडकरीची 'ठरलं तर मग' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर; कथाबाह्य कार्यक्रम पडले मागे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Mahangarpalika Election 2026: पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत

व्हिडीओ

Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Mahangarpalika Election 2026: पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
Donald Trump on India: अमेरिकेची धमकी, रशियाकडून भारताची तेल आयातीत घट; ट्रम्प म्हणाले, 'मोदींनी मला खूश करण्यासाठी हे केलं, त्यांना माहित होतं मी नाराज आहे'
अमेरिकेची धमकी, रशियाकडून भारताची तेल आयातीत घट; ट्रम्प म्हणाले, 'मोदींनी मला खूश करण्यासाठी हे केलं, त्यांना माहित होतं मी नाराज आहे'
BMC Election 2026: नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
Airoli-Katai Naka Freeway: नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
Umar Khalid: 'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
Embed widget