(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nikki Tamboli and Arbaz Patel : 'आज मी पूर्ण जगासमोर सांगते की...', निक्कीने व्यक्त केल्या अरबाजविषयीच्या भावना
Nikki Tamboli and Arbaz Patel : निक्कीने अरबाजविषयीच्या भावना बिग बॉसच्या घरात व्यक्त केल्या असल्याचं पाहायला मिळतंय.
Nikki Tamboli and Arbaz Patel : बिग बॉसच्या घरातील (Bigg Boss Marathi New Season) प्रेमाच्या वाऱ्यांची कायमच चर्चा होत असते. या सीझनमध्येही ती चर्चा झाली. निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेल (Arbaz Patel) यांचं नातंही बरंच गाजतंय. मधले काही दिवस त्या दोघांमध्ये वादही पाहायला मिळाले. पण पुन्हा एकदा एकत्र येत निक्की आणि अरबाजने त्यांच्यातलं नात कायम ठेवलं. त्यामुळे घरातल्यांसह प्रेक्षकांनाही त्यांच्या नात्याविषयी कायमच प्रश्न पडतात.
दरम्यान घरात नुकत्याच पडलेल्या एका टास्कमध्ये निक्कीने अरबाजविषयीच्या तिच्या भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आहे. इतकच नव्हे तर तिने अरबाजचसोबतचं नात कायम ठेवण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा वेगळी चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय.
'आज मी पूर्ण जगासमोर सांगतेय...'
निक्कीने अरबाजविषयी बोलताना म्हटलं की, 'माझ्यासाठी अरबाज एक कंफर्ट आहे. अर्थात आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो, पण मी अरबाजला ओळखत नव्हते पण मी तो मला ओळखत होता. जसं आम्ही एकत्र घरात आलो, तसंच आमच्यात खूप चांगली मैत्रीही झाली. आमचं नातं चांगल तयार होत असताना आमच्यावर वादही झाले. पण माझ्या मनात एकच गोष्ट होती की, जर मी हा खेळ अरबाजसोबत सुरु केला आहे तर मी तो त्याच्याचसोबत संपवेन. त्याच्या विरुद्ध मला कधीही जायचं नाहीये. आज ही हे पूर्ण जगासमोर सांगते की मला मनापासून ती व्यक्ती आवडते. तूच माझा एक कंफर्ट असून माझी मनापासून इच्छा आहे की, आपली मैत्री फक्त इथेच नाही तर घराबाहेरही कायम राहावी.'
घरातला टास्क नेमका काय होता?
घरातील सदस्यांना घरात त्यांच्या कंफर्ट झोन असलेल्या व्यक्तीविषयी भावना व्यक्त करायच्या होत्या. त्यावेळी अनेकांनी त्यांचा त्यांचा कंफर्ट झोन सांगितला. त्याचवेळी निक्कीने अरबाजविषयीच्या तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'मी कमिटेड आहे...'
दरम्यान याआधी बिग बॉसच्या घरातील एका टास्कमध्ये अरबाजने तो कमिटेड असल्याचंही सांगितलं होतं. तसेच त्याची गर्लफ्रेंड लिझा बिंद्रा ही देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून निक्की आणि अरबाजचं नातं पाहून पोस्ट शेअर करत असते. त्यामुळे सध्या तिच्याही पोस्ट बऱ्याच चर्चेत आल्या आहेत. त्यावरुन तिने अरबाजसोबत ब्रेकअप केल्याचंही म्हटलं जातंय.