एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 :  'मला माज दाखवू नकोस', प्रेमाचे वारे वाहत असतानाच पडली वादाची पहिली ठिणगी; निक्की अन् अरबाजमध्ये बाचाबाची 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात प्रेमाचे वारे वाहत असल्याचं म्हटलं जात होतं. पण ज्यांच्यात हे वारे वाहत होते, त्यांच्यात आता वादाची पहिली ठिणगी पडली असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 :  राम कृष्ण हरि म्हणत पुरुषोत्तम दादा यांनी बिग बॉसच्या घरातून (Bigg Boss Marathi Season 5) एक्झिट घेतली. त्यानंतर आता पुन्हा एकदा घरातल्यांची घरात टिकून राहण्यासाठीचा संघर्ष  सुरु झालाय. पहिलाच आठवडा हा निक्कीने गाजवला आणि वाजवलाही. पण त्याच्यासाठी रितेशने तिची तशीच शाळाही घेतली. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात घरातल्यांना खेळाबाबत बऱ्याच गोष्टी कळाल्या. असं सगळं असलं तरीही अरबाज (Arbaz Patel) आणि निक्की (Nikki Tamboli) यांच्या प्रेमाच्या विशेष चर्चाही पहिल्या आठवड्यात रंगल्या. पण आता याच मैत्रीमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली असल्याचं पाहायला मिळतंय. 

निक्की अरबाजला समजावत असताना अरबाजचा आवाज वाढतो, त्यावेळी निक्की त्याच्यावर चांगलीच भडकते. त्यामुळे या दोघांमध्ये वादाची पहिली ठिणगी पडते. दरम्यान घन:श्याम, जान्हवी आणि वैभव या दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणूनच आता ज्यांची मैत्री जुळली होती, त्यांच्यातही आता वादाला तोंड फुटलं आहे. 

निक्की आणि अरबाजमध्ये नेमकं काय झालं?

आपण समोरच्या व्यक्तीवर जो अटॅक केला आहे,त्यामुळे पुन्हा एकदा आपण चुकीचे दिसलो असणार, असं निक्की म्हणते. त्यावर अरबाज म्हणतो, मी फक्त त्याच्या जॅकेटमधून चष्माचा बॉक्स काढला, पाहिला आणि ठेवला. तेही तो मस्करीमध्ये घेत होता, असं स्पष्टीकरण अरबाजने दिलं. पण तिथे जो सिन क्रिएट झाला त्यामुळे आपण वाईट दिसलो आहोत, असं मत निक्की मांडते. त्यावर आपण कुठे वाईट दिसलो आहोत, असा प्रश्न अरबाज विचारतो. या दोघांचा हा संवाद सुरु असतानाच त्यामध्ये वैभव आणि जान्हवी देखील उडी घेतात. अरबाजचं ज्याच्यासोबत भांडण झालं, त्याची बाजू घेत असल्याचं अरबाज निक्कीला म्हणतो.  पुढे तो म्हणतो, की तुला त्याची बाजू घ्यायची असेल तर पूर्ण घे,अशी अर्धवट घेऊ नकोस. त्यावर निक्की म्हणते की, मी त्याची बाजू घेत नाही, मला असा माज दाखवू नकोस. तू देखील मला माज दाखवू नकोस असं उत्तर अरबाज निक्कीला देतो. 

पुढे निक्की अरबाजला म्हणते की, तू माज दाखवतोय, मी इकडेच उभी आहे. हे असंय ना, मग माझं याच्यापेक्षा जास्त आहे. त्याने हा अपमान केलाय आणि जोपर्यंत तो स्वत: बोलायला येत नाही, तोपर्यंत मी त्याच्याकडे जाणार नाही, असं बोलून निक्कीही तिकडून निघून जाते. या दोघांचा वाद पाहून घन:श्याम जान्हवी आणि वैभव या दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. घन:श्याम म्हणतो की, त्या लोकांनामुळे आपल्यात भांडणं नको. 

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : गुलिगत सूरज आणि जान्हवीचा जोरदार वाद; फालतू असल्याचं म्हणणाऱ्या जान्हवीला सूरजचे सडेतोड उत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget