एक्स्प्लोर
Advertisement
...म्हणून मी मालिका सोडून देणार: अभिनेत्री निया शर्मा
मुंबई: छोट्या पडद्यावरील मालिका 'जमाई राजा'ची कथा 20 वर्ष पुढची दाखवली जाणार आहे. त्यामुळे या मालिकेतील कलाकारांचं वयही 20 वर्षानं वाढणार आहे. अशीही बातमी आहे की, मालिका 20 वर्षानं पुढे जाणार असल्यानं 'रोशनी'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री निया शर्मा ही मालिका सोडणार आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार निया शर्मा म्हणाली की, 'मी हा शो सोडते आहे. माझा हा स्वत:चा निर्णय आहे. माझ्यात आणि प्रोडक्शन टीममध्ये काहीही झालेलं नाही. कारण की, ही मालिका आता २० वर्षांनी पुढे जाणार आहे. त्यामुळेच मी हा शो सोडण्याचा निर्णय घेत आहे.
निया म्हणाली की, 'मी स्क्रीनवर माझ्या वयापेक्षा स्वत:ला जास्त पाहू शकत नाही. त्यासाठी मी हा शो सोडते आहे.' अभिनेत्री निया शर्मा म्हणते की, या निर्णयानं ती बेरोजगार होणार आहे. पण लवकरच आपल्याला काही तरी चांगलं काम मिळेल अशी आशा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जालना
भारत
भंडारा
Advertisement