नवविवाहित दाम्पत्य सुगंधा आणि संकेतच्या अडचणी वाढल्या, पंजाबमध्ये गुन्हा दाखल
नवविवाहित दाम्पत्य सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांच्याविरोधात पंजाबमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. कोविड-19 विषयक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे.
मुंबई : कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि तिचा पती कॉमेडियन संकेत भोसले यांनी 26 एप्रिल रोजी पंजाबच्या फगवाडामधील क्लब कबाना रिसॉर्टमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. परंतु हे लग्न आता वादात सापडली आहे. कारण या नवविवाहित दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोविड-19 विषयक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली असून तपास सुरु आहे.
अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेले सुगंधा आणि संकेत काही दिवसांपूर्वीच बोहल्यावर चढले. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये कोविड-19 नियमांनुसार निश्चित केलेल्या संख्येपेक्षा जास्त लोक लग्नात सहभागी झाल्याचं दिसत होतं. हाच व्हिडीओ आता दोघांसाठी अडचणीचा ठरत आहे.
स्थानिय पोलिसांनी नियमांचं उल्लंघन केल्यानंतर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि भारतीय दंड विधानाच्या कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी केवळ नवविवाहित दाम्पत्यावरच नाही तर ज्या रिसॉर्टमध्ये हे लग्न पार पडलं, त्याच्या व्यवस्थापन आणि लग्नात सहभागी झालेल्या पाहुण्यांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणाच्या अटकेचं वृत्त नाही.
एबीपीने याबाबत सुगंधा आणि संकेत यांची बाजू जाणून घेण्यासाठी दोघांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु बातमी लिहीपर्यंत दोघांकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नव्हतं.
परंतु सुगंधा मिश्राच्या मॅनेजरने कोविड-19 नियमांच्या उल्लंघनाच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना सांगितलं की, "वधू आणि वर यांच्याकडून प्रत्येकी 20-20 पाहुणे लग्नात सहभागी होण्याची परवानगी आम्ही स्थानिक पोलिसांकडून घेतली होती आणि 40 लोकच उपस्थित होते. कोणत्याही नियमांचं उल्लंघन होऊ नये याची संपूर्ण काळजी आम्ही घेतली होती. लग्नात मर्यादे आणि परवानगीपेश्रा जास्त पाहुणे सहभागी झाल्याचं वृत्त चुकीचं आहे.
सुगंधाने संकेत सोबत लग्न करण्याआधी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की, मला धूमधडाक्यात लग्न करायं आहे. परंतु कोरोनामुळे मला असं करता येणार नाही. लग्नात दोन्ही कुटुंबातील निवडक आणि जवळचे लोकच सहभागी होतील.