एक्स्प्लोर
Advertisement
टीव्ही शोमध्ये काम करण्याच्या सिद्धू यांच्या इराद्याला सुरुंग?
चंदीगड : टीव्ही शोमध्ये काम करत राहण्याच्या नवज्योतसिंह सिद्धू यांच्या इराद्यांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे. नवज्योतसिंह सिद्धू मंत्री असून टीव्ही शोमध्ये सहभागी होऊ शकतात की नाही, याविषयी कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह म्हणाले आहेत.
नवज्योतसिंह सिद्धू हे कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या मंत्रिमंडळात आहेत. तसंच सोनी टीव्हीवरील 'द कपिल शर्मा' या शोमध्ये ते सेलिब्रिटी गेस्ट म्हणून झळकतात.
मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर नवज्योतसिंह सिद्धू यांनी टीव्हीवर काम करण्याचा इरादा बोलून दाखवला होता. तसंच रात्री शूटिंग करुन दिवसा मंत्रिपदाचं काम करेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
परंतु सिद्धू यांनी टीव्हीवर काम करणं सुरु ठेवावं की नाही यावर अॅटर्नी जनरल यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेईन. संविधानात याबाबत काय तरतूद आहे, हे मला माहित नाही. मंत्री असताना त्यांना हे काम करता येईल का याबाबत वकिलांना विचारणार आहे. हे संपूर्णत: कायद्यावर अवलंबून आहे, असं कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर स्थानिक प्रशासन, पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग, संग्रह आणि संग्रहालय यांसारख्या मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
क्राईम
Advertisement