'मुलगी झाली हो'मध्ये साजिरी-शौनकची लगीनघाई; 'झिम्मा'च्या टीमची हजेरी
'मुलगी झाली हो' या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मलिकेतील साजिरी आणि शौनकच्या लग्नाची उत्सुकता प्रेक्षकांना होती.
Mulgi Zali Ho Show : 'मुलगी झाली हो' या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मलिकेतील साजिरी आणि शौनकच्या लग्नाची उत्सुकता प्रेक्षकांना होती. अनेक संकटांचा सामना केल्यानंतर अखेर साजिरी आणि शौनक विवाहबंधनात अडकणार आहेत. या दोघांना आशीर्वाद देण्यासाठी स्वाभिमान, सहकुटुंब सहपरिवार, आई कुठे काय करते, फुलाला सुगंध मातीचा आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमधील कलाकार हजेरी लावणार आहे. यासोबतच 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'चे परिक्षक सचिन पिळगांवकर, सूत्रसंचालक सिद्धार्थ चांदेकर आणि अवनी जोशी हे देखील या विवाहसोहळ्याल उपस्थित राहणार आहेत.
स्टार प्रवाहच्या परिवारासोबतच 'झिम्मा' या आगामी चित्रपटाची टीम देखील या लग्नसोहळ्याला हजेरी लावून साजिरी आणि शौनकला त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देणार आहेत. 21 नोव्हेंबरला 2 तासाच्या विशेष भागामध्ये 'मुलगी झाली हो' मालिकेतला हा शाही विवाहसोहळा प्रेक्षकांना बघता येईल.
View this post on Instagram
Netflix Website : Netflix प्रेमींसाठी खुशखबर! लोकप्रिय सिनेमे आणि वेब सीरिजसाठी नवी वेबसाइट लॉन्च
मालिकेतल्या या लग्नसोहळ्यासाठी साजिरी म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकर खूपच उत्सुक आहे. लहानपणापासून ज्याचं स्वप्न पाहिलं त्या शौनकशी विवाह होत असल्यामुळे तिचं स्वप्न पूर्ण होत आहे. या विवाहसोहळ्यासाठी साजिरीचा खास लूक डिझाईन करण्यात आला आहे. मेहंदी, संगीत, हळद आणि लग्नातला लूक बऱ्याच लूक टेस्ट घेतल्यानंतर फायनल करण्यात आला आहे. नववधूच्या रुपात स्वत:ला पाहिल्यानंतर माझं खरंच लग्न होतंय असं वाटत होतं. त्यामुळे मी आणि मुलगी झाली हो मालिकेची संपूर्ण टीम या खास विवाहसोहळ्यासाठी उत्सुक आहोत.
Taapsee Pannu : तब्बल 12 तास डोळ्यांवर पट्टी... अन् तापसीनं केलं असं काही; तुम्हीही ऐकून थक्क व्हाल!