एक्स्प्लोर

Milind Shinde : मिलिंद शिंदे 'या' मालिकेत साकारणार गुरुआईची भूमिका; नागनाथ आणि गुरुआई यांच्या संघर्षाची महागाथा होणार सुरू

Milind Shinde : 'गाथा नवनाथांची' या मालिकेत मिलिंद शिंदे गुरुआईची भूमिका साकारणार आहे.

Milind Shinde : अनेक यशस्वी भागांनंतरही 'गाथा नवनाथांची' (Gatha Navnathanchi) ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. बाल नागनाथांच्या भूमिकेत आरूष बेडेकरचा कमाल अभिनय प्रेक्षक अनुभवत आहेतच. त्यातच आता बाल नागनाथांना काटशह देण्यासाठी गुरुआईचा प्रवेश गावात झालेला पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे गुरुआई या भूमिकेसाठी सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे (Milind Shinde) यांची निवड करण्यात आलेली आहे.

'गाथा नवनाथांची' या मालिकेत मिलिंद शिंदे गुरुआईची भूमिका साकारणार आहे. 'गाथा नवनाथांची' मालिकेत आजवर सादर झालेल्या व्यक्तिरेखा आणि त्या साकारणारे कलाकार यांची उत्तम निवड 'गाथा नवनाथांची' या मालिकेच्या यशाचं गमक आहे.

'गाथा नवनाथांची' मालिकेत सध्या घमासान युद्ध परिस्थिती रंगली आहे. हे युद्ध बाल नागनाथ आणि गुरुआई यांमध्ये घडताना दिसतंय. बाल नागनाथांनी गावाचे रक्षण तसेच उद्धार करण्याचा विडा उचललेला आहे. पण बाल नागनाथांचे समाजकार्य आणि गावकऱ्यांच्या मनामधील त्यांच्याविषयीची वाढत जाणारी आस्था, आपुलकी गावातील पाटलांच्या नजरेत खुपते आहे. 

बाल नागनाथांचा बंदोबस्त करण्यासाठी पाटील गुरुआईला बोलावणं धाडतात, पण बाल नागनाथ गुरुआईचा प्रत्येक वार निकामी करताना दिसताहेत. पाटलांच्या सांगण्यावरून षडयंत्र रचणारे गुरुआई हे पात्र मिलिंद शिंदे या सुप्रसिद्ध अभिनेत्याने रंगवले असून आपल्या अनेकविध भूमिकांनी लोकपसंतीस उतरणारे मिलिंद शिंदे सोनी मराठीवरील 'गाथा नवनाथांची' या मालिकेतील 'गुरुआई' या भूमिकेद्वारा प्रेक्षकांच्या पसंतीस पुन्हा एकदा पात्र ठरतील यात काहीच शंका नाही.   

'गाथा नवनाथांची' मालिकेत गुरुआईच्या भूमिकेतून मिलिंद शिंदे प्रेक्षकांच्या भेटीस!

बाल नागनाथ म्हणजेच आरूष बेडेकर आणि गुरुआई म्हणजेच अर्थात मिलिंद शिंदे यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणं खरोखरीच रंजक आहे. मिलिंद शिंदेनी आजवर अनेक भूमिका गाजवल्या आहेत, पण सध्या या मालिकेत त्यांनी साकारलेली गुरुआई ही भूमिका आणि त्यांनी या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत उल्लेखनीय आहे. अंगावर हिरवीकंच साडी.. डोक्यावर पदर.. कपाळावर हळद कुंकवाचा भला मोठा टिळा आणि गळ्यात घातलेलं डोरलं.. नेमकं यातून काय निर्देशित करण्याचा प्रयत्न आहे, हे रहस्य लवकरच उलगडणार आहे.

गुरुआई केवळ पाटलांच्या सांगण्यावरून बाल नागनाथांच्या मार्गात अडथळे घालतेय की आणखीसुद्धा काही रहस्ये त्यामागे दडली आहेत. यांचा उलगडा लवकरच होणार आहे. त्यामुळे या मालिकेची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

217 Padmini Dham : '217 पद्मिनी धाम'चा थरार रंगभूमीवर; रत्नाकर मतकरींच्या कथेवर आधारित नाटक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget