Mazya Navryachi Bayako : 'माझ्या नवऱ्याची बायको' आता येणार हिंदीत, प्रोमो आऊट
Mazya Navryachi Bayako : 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेचं हिंदी व्हर्जन आता सुरू होणार आहे.
Mazya Navryachi Bayako : 'माझ्या नवऱ्याची बायको' (Mazya Navryachi Bayako) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून आता या मालिकेचं हिंदी व्हर्जन सुरू होणार आहे. त्यामुळे हिंदी भाषिक प्रेक्षकांना आता ही मालिका पाहायला मिळणार आहे.
'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका 'मेरे साजन की सहेली' या नावाने झी च्या हिंदी वाहिनीवर सुरू होणार आहे. छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही लोकप्रिय मालिका होती. ही मालिका आता हिंदीमध्ये डब करून हिंदी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे.
View this post on Instagram
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत अनिता दातेने राधिकाची भूमिका साकारली होती. तर तिच्या नवऱ्याची गुरुनाथची भूमिका अभिनेता अभिजित खांडकेकरने साकारली होती. तर गुरुनाथच्या गर्लफ्रेंडची भूमिका अभिनेत्री रसिक सुनीलने साकारली होती. आता 'मेरे साजन की सहेली' मालिकेचा प्रोमो आऊट झाल्याने प्रेक्षक मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या
Prajakta Mali : '...म्हणून हा घाट'; मनसे गुढीपाडवा मेळाव्यानंतर प्राजक्ता माळीची खास पोस्ट
Kiran Gaikwad : देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाडची पोस्ट चर्चेत; म्हणाला, 'आता पुढचा प्रवास हिच्यासोबत'
The Kashmir Files : द कश्मीर फाइल्स मधील 'हा' सिन शूट करताना अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री आणि दर्शनला अश्रू अनावर; पाहा व्हिडीओ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha