एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Mi Honar Superstar Jodi No 1 Finale : पुण्याचे आकाश आणि सुरज मोरे ठरले ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’चे महाविजेते, लाखोंचे बक्षीस

Mi Honar Superstar Jodi No. 1 Finale : ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’मध्ये पुण्याची जिगरबाज जोडी आकाश आणि सुरज मोरे यांनी बाजी मारली.

Mi Honar Superstar Jodi No. 1 Finale :  मागील काही महिन्यांपासून छोट्या पडद्यावर रंगलेला रिएल्टी शो ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन' (Mi Honar Superstar Jodi No. 1) ची महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’मध्ये पुण्याची जिगरबाज जोडी  आकाश आणि सुरज मोरे यांनी बाजी मारली. या कार्यक्रमात उपविजेतेपदाचा मान विभागून देण्यात आला. विजेते ठरलेल्या आकाश-सुरजच्या जोडीला पाच लाख रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. 

स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. पलख-पूर्वा, आकाश-सुरज, सिद्धेश-रुचिता आणि अपेक्षा-प्रतिक्षा यांच्यामध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत कोथरुड पुणे येथील आकाश आणि सुरज मोरे या जिगरबाज जोडीने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेते पदाचा मान सिद्धेश थोरात-रुचिता जामदार आणि अपेक्षा लोंढे-प्रतिक्षा लोंढे या दोन जोड्यांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक  पूर्वा साळेकर आणि पलक मोरे या जोडीने पटकावला. महाअंतिम सोहळ्यातील विजेती जोडी आकाश आणि सुरज मोरे यांना पाच लाखांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. तर उपविजेता जोडीला दोन लाख आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या जोडीला 1 लाख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. 

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना आकाश आणि सुरज म्हणाले, ‘आम्ही आजवर बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतला मात्र मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन या कार्यक्रमाने विजेतेपदाचा आनंद मिळवून दिला. हा सारा प्रवास स्वप्नवत असून या क्षणाची खूप वाट पाहिली होती. महाअंतिम सोहळ्यात सामील होण्यासाठी आम्ही बरीच मेहनत घेतली होती. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत असल्याचे त्यांनी म्हटले. या मंचामुळे अंकुश चौधरी, फुलवा खामकर आणि वैभव घुगे हे गुरुच्या रुपात दिले असल्याची कृतज्ञ भावनाही या दोघांनी केला. 

आकाश आणि सुरज दोघेही सख्खे भाऊ. लहानपणापासूनच दोघांनाही नृत्याची आवड होती. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. मात्र तरीही दोघांची नृत्याची आवड लक्षात घेऊन त्यांच्या आईने त्यांना नृत्याचं प्रशिक्षण देण्याचं ठरवले. अनेक अडचणींचा सामना करत आकाश आणि सुरजने आपली नृत्याची आवड जोपासली. अनेक छोट्या मोठ्या स्पर्धांमधून भाग घेत घेत आकाश-सुरजला मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन कार्यक्रमाविषयी कळलं आणि त्यांनी ऑडिशनसाठी थेट मुंबई गाठली. आकाश आणि सुरजचं यश पाहून त्यांच्या आईचे डोळे पाणावले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? ग्राफिक्सवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

GulabRao Patil On Ladki Bahin Yojana | आमच्या लाडक्या बहिणी बेईमान होणार नाही - गुलाबराव पाटीलNitin Gadkari Nagpur Bus : विमानासारख्या सुविधा बसमध्ये मिळणार, गडकरींनी सांगितलेली बस नेमकी कशी?एबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 04 October 2024NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? ग्राफिक्सवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Rajeev Patil: हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
सोशल मीडियावर नंबर वन पण कामात...  या महिला अधिकाऱ्याच्या बदलीची देशभरात चर्चा
सोशल मीडियावर नंबर वन पण कामात... या महिला अधिकाऱ्याच्या बदलीची देशभरात चर्चा
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
Embed widget