Marathi Serial Updates Zee Marathi : 'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
Marathi Serial Updates Zee Marathi : 'लागिरं झालं जी'या मालिकेत आज्याची भूमिका साकारणारा नितीन चव्हाणचे पुन्हा एकदा झी मराठीवर ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून कमबॅक होत आहे.
Marathi Serial Updates Zee Marathi : टीआरपीच्या स्पर्धेत आघाडीवर राहण्यासाठी सध्या छोट्या पडद्यावर नव्या मालिका सुरू आहेत. या नव्या मालिकांमध्ये वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांची पुन्हा वर्णी लागत आहे. झी मराठीवर लोकप्रिय ठरलेली 'लागिरं झालं जी'या मालिकेत आज्याची भूमिका साकारणारा नितीश चव्हाणचे (Nitish Chavan) पुन्हा एकदा झी मराठीवर ‘लाखात एक आमचा दादा’ ( Lakhat Ek Amacha Dada) या मालिकेतून कमबॅक होत आहे. या मालिकेत नितीनसोबत अफेअरची चर्चा रंगलेली अभिनेत्री श्वेताही झळकणार असल्याची माहिती आहे.
झी मराठी वाहिनीवर 'लागिरं झालं जी' या मालिकेला चांगली लोकप्रियता मिळाली होती. आता झी मराठीवर पुन्हा एकदा निर्माती श्वेता शिंदे आता आपली नवी मालिका ‘लाखात एक आमचा दादा’ घेऊन येणार आहेत. या मालिकेची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. आता, मालिकेच्या प्रोमोसह कलाकारांची नावेही समोर येत आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ मध्ये लागिरं झालं जी या मालिकेत टॅलेंट ही व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता महेश जाधवचीदेखील भूमिका असणार आहे.
View this post on Instagram
नितीनसोबत कोणती अभिनेत्री झळकणार?
‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत नितीनसोबत ‘मन झालं बाजिंद’ मधील कृष्णा म्हणजेच अभिनेत्री श्वेता खरात झळकणार आहे. श्वेताने या आधी 'राजा रानीची गं जोडी' या मालिकेतही भूमिका साकारली होती. आता, ‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेत नितीश व श्वेता यांची ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे.
रिअल लाईफ कपल?
नितीन आणि श्वेता यांचे अफेअर सुरू असल्याच्या चर्चा मध्यंतरी सुरू होत्या. दोघेही रील्समध्ये दिसत असल्याने या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आमच्या चांगली मैत्री असल्याचे स्पष्ट करत दोघांनी या चर्चांना पूर्ण विराम लावला. श्वेताने सन मराठी वाहिनीवरील सुंदरी या मालिकेतही सियाची भूमिका साकारली होती.
‘लाखात एक आमचा दादा’चे कथानक काय?
या मालिकेचे कथानक एक भाऊ आणि त्याच्या चार बहिणींभोवती आहे. स्वभावाने भोळसट, करारी मर्द, करड्या शिस्तीचा मात्र बहिणींच्या सुखासाठी, त्यांच्या रक्षणासाठी आणि त्यांची लग्न उत्तमोत्तम घरात लागावीत यासाठी दिवस रात्र जीवाचे रान करणारा भाऊ यांची साधी पण सुंदर गोष्ट आहे. या मालिकेचं लेखन स्वप्नील चव्हाण आणि विशाल कदम यांनी केले आहे. तर किरण दळवी हे मालिकेचे दिग्दर्शक आहेत. ‘वज्र प्रोडक्शन’ या मालिकेची निर्मिती करणार आहेत. ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.