(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathi Serial Updates Yed Lagla Premacha : 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत नव्या अभिनेत्याची एन्ट्री, सहा वर्षांनी 'स्टार प्रवाह'वर करतोय कमबॅक
Marathi Serial Updates Yed Lagla Premacha : मागील काही एपिसोडमध्ये या मालिकेच्या कथानकात ट्वीस्ट आले आहेत. आता या मालिकेत नव्या अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.
Marathi Serial Updates Yed Lagla Premacha : छोट्या पडद्यावर मागील काही काळात नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या नव्या मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'स्टार प्रवाह'वरील 'येड लागलं प्रेमाचं' (Yed Lagla Premacha) मालिकेला प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. मागील काही एपिसोडमध्ये या मालिकेच्या कथानकात ट्वीस्ट आले आहेत. आता या मालिकेत अभिनेता संग्राम साळवीची (Sangram Salvi) मालिकेत एन्ट्री होणार असून सहा वर्षांनी तो स्टार प्रवाहवरील मालिकेत दिसणार आहे.
'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता संग्राम साळवीची एन्ट्री होणार आहे. 'देवयानी' मालिकेमुळे संग्राम घराघरात पोहोचला. 'तुमच्यासाठी कायपण' हे त्याचे वाक्य आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 'देवयानी' आणि 'कुलस्वामिनी' या स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेत लक्षवेधी भूमिका साकारलेला संग्राम जवळपास सहा वर्षांनंतर स्टार प्रवाहच्या मालिकेत झळकणार आहे.
'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतील भूमिकेबाबत संग्राम साळवी चांगलाच उत्साही आहे. संग्रामने सांगितले की, ‘स्टार प्रवाह कुटुंबाचा मी जुना सदस्य आहे. या कुटुंबासोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मला मिळतेय याचा आनंद आहे. 'देवयानी' मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आजही प्रेक्षक 'देवयानी' मालिकेत मी साकारलेल्या पात्राची प्रशंसा करतात. 'तुमच्यासाठी कायपण' हा सुपरहिट डायलॉग बोलून दाखवण्याची मागणी करतात. इतक्या वर्षांनंतरही या पात्राविषयी असलेलं प्रेम पाहून भारावून जायला होतं असेही संग्राम साळवीने सांगितले.
View this post on Instagram
मालिकेत खलनायकी भूमिका
'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मी साकारत असलेलं पात्र देखील हटके आहे. खलनायक साकारतोय असं म्हटले तरी वावगं ठरणार नाही असेही त्याने सांगितले. खलनायक साकारताना एक कलाकार म्हणून नेहमी कस लागतो. भूमिकेतले बारकावे हळूहळू आत्मसात करत असल्याचे त्याने सांगितले. मायबाप रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद आणि प्रेम या पात्रालाही मिळो हीच इच्छा व्यक्त करेन असेही त्याने म्हटले.
रायाचा नवा लूक...
मालिकेतील रांगड्या रुपातील रायाचा आता नवा लूक समोर आला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने राया आता नव्या रुपात दिसत आहे. या लूकच्या निमित्ताने रायाची भूमिका साकारणारा अभिनेता विशाल निकम याने जवळपास दोन वर्षांनी केसांना कात्री लावली.