Marathi Serial Top Serial : टीआरपीच्या शर्यतीत 'झी मराठी'ची दमछाक, 'स्टार प्रवाह'चा दबदबा, अव्वल स्थानी कोणती मालिका?
Marathi Top 10 Serial TRP : या वर्षातील 10 व्या आठवड्यातही स्टार प्रवाहचा दबदबा दिसून आला. टॉप 10 टेन मालिकांच्या यादीत स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका आहेत. तर, दुसरीकडे झी मराठीवरील वाहिन्यांवरील चार मालिकांचा टीआरपी वाढला आहे.
Marathi Top 10 Serial TRP : छोट्या पडद्यावर टीआरपीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या वर्षातील 10 व्या आठवड्यातही स्टार प्रवाहचा दबदबा दिसून आला. टॉप 10 टेन मालिकांच्या यादीत स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका आहेत. तर, दुसरीकडे झी मराठीवरील वाहिन्यांवरील चार मालिकांचा टीआरपी वाढला आहे. मात्र, टॉप-15 मध्येही या मालिकांना स्थान मिळवता आले नाही.
टॉप-15 मालिकांमध्ये स्टार प्रवाहच्या मालिका, झी मराठीचे काय?
स्टार प्रवाह वरील मालिकांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पहिल्या 15 स्थानांवर प्रवाहच्या मालिका आहेत. टीआरपीच्या यादीत 'ठरला तर मग' ही मालिका अव्वल स्थानी आहे. तर, दुसऱ्या स्थानावर 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका आहे. तिसऱ्या स्थानावर 'लक्ष्मीच्या पावलां'नी ही मालिका आहे. स्टार प्रवाह वरील या तिन्ही मालिकांमध्ये अव्वल स्थानावर राहण्यासाठी जोरदार तीव्र स्पर्धा दिसून येते.
'झी मराठी'ने काही दिवसांपूर्वी नवीन मालिका लाँच केल्या आहेत. मात्र, 'झी मराठी'च्या पातळीवर 'तुला शिकविन चांगलाच धडा' ही मालिका आघाडीवर आहे. तर, टीआरपीच्या यादीत 17 व्या स्थानी आहे. त्यानंतर 18 व्या स्थानावर 'पारू', 19 व्या स्थानावर 'शिवा', 20 व्या स्थानावर 'सातव्या मुलीची सातवी मुलगी', 21 व्या स्थानावर 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका आहे. 'झी मराठी'च्या या मालिकांच्या टीआरपीमध्ये वाढ झाली आहे.
टीआरपी यादीतील टॉप 10 मालिका
1. टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका 6.9 रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे.
2. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) ही मालिका 6.8 रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
3. 'लक्ष्मीच्या पावलांनी' (Lakshmichya Pavalani) ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर असून 6.7 रेटिंग मिळाले आहे.
4. 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर असून मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.
5. टीआरपी लिस्टमध्ये 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका पाचव्या स्थानावर आहे. या मालिकेला 5.8 रेटिंग मिळाले आहे.
6. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सहाव्या क्रमांकावर असून या मालिकेचा टीआरपी कमी झाला आहे. या मालिकेला 5.2 रेटिंग मिळाले आहे.
7. 'कुन्या राजाची गं तू रानी' (Kunya Rajachi Ga Tu Rani) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सातव्या स्थानावर आहे. या मालिकेच्या टीआरपीमध्ये वाढ झाली असून 4.7 रेटिंग मिळाले आहे.
8. 'मन धागा धागा जोडते नवा' (Man Dhaga Dhaga Jodte Nava) या मालिकेचा महाएपिसोड आठव्या स्थानावर आहे. महाएपिसोडला 4.6 रेटिंग आहे.
9. 'मन धागा धागा जोडते नवा' (Man Dhaga Dhaga Jodte Nava) ही मालिका टीआरपीच्या यादीत 9 व्या स्थानी आहे. मालिकेच्या टीआरपीत घट झाली असून 4.4 रेटिंग मिळाले आहे.
10. 'कुन्या राजाची गं तू रानी' (Kunya Rajachi Ga Tu Rani) या मालिकेचा महाएपिसोड दहाव्या स्थानावर असून 4.3 रेटिंग मिळाले आहे.