Maharashtra Television News :  विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...


Yashoda : बयोचा 'श्यामची आई' होण्याचा प्रवास होणार सुरू; 'या' दिवशी रंगणार विवाह विशेष भाग


 


Yashoda Marathi Serial Latest Update : 'यशोदा- गोष्ट श्यामच्या आईची' (Yashoda Goshta Shyamchya Aaichi) ही मालिका आज एक नवीन वळण घेणार आहे. अवखळ अल्लड तसेच अतिशय धीट असलेल्या बयोच्या आयुष्यात नवीन घटना घडणार आहे ती म्हणजे बयोचा लवकरच सदाशिवरावांबरोबर विवाह होणार आहे.


प्रेक्षकांची लाडकी बयो आता यशोदा सदाशिवराव साने होणार आहे. बयोचा आता नवीन जन्म होणार आहे. सदाशिवराव साने यांच्याबरोबर सहचारिणी म्हणून यशोदेचा नवीन प्रवास सुरू होणार आहे. बयोचा वैशाख कृष्ण द्वितीयेला विवाह सोहळा संपन्न होणार आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Tuzech Mi Geet Gaat Aahe: आवाज परत आल्यामुळे स्वराला झाला आनंद; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो व्हायरल


Tuzech Mi Geet Gaat Aahe:   तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)   या मालिकेमध्ये एक मोठा ट्वीस्ट आला आहे. या मालिकेमधील स्वराज ऊर्फ स्वराचा आवाज परत आला आहे. गेली कित्येक दिवस स्वराला बोलताना येत नव्हतं आता स्वराला बोलता येत असल्यानं मल्हारला आनंद झाला आहे. आवाज परत आल्यानंतर स्वराजनं मल्हारला सर्व सत्य सांगितलं आहे. स्वरा ही वैदेहीची मुलगी आहे, हे आता मल्हारला कळालं आहे. हे ऐकून मल्हार आश्चर्यचकित झाला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Jennifer Mistry Bansiwal: जेनिफरनं 'तारक मेहता' च्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर मालिकेतील आत्माराम भिडे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...


Mandar Chandwadkar On Jennifer Mistry Bansiwal: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधील  रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालनं (Jennifer Mistry Bansiwal) असित मोदी आणि मालिकेच्या टीममधील इतर दोन व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. जेनिफर मिस्त्री बंसीवालनं असित मोदी, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे प्रोजेक्ट हेड सोहिल रमानी आणि  एग्झीक्युटिव्ह प्रोड्यूसर जतिन बजाज यांच्यावर लैंगिक छळाचा (Sexual harassment) आरोप केला आहे. त्यामुळे सध्या जेनिफर मिस्त्री बंसीवाल ही चर्चेत आहेत.  आता या प्रकरणावर तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील आत्माराम भिडे ही भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर (Mandar Chandwadkar)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Aai Kuthe Kay Karte : अरुंधती, संजनानंतर अनिरुद्ध आता वीणाच्या मागे; नेटकरी म्हणाले,"आजोबा आता तिसऱ्यांदा लग्न करणार का?"


Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत आता नवा ट्वीस्ट आला आहे. आता या मालिकेत आशुतोषच्या बहिणीची एन्ट्री होणार आहे. वीणा ही अनिरुद्धची बिझनेस पार्टनर आहे. त्यामुळे संजना आणि अनिरुद्धच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे. 


ईशा आणि अनिशच्या साखरपुड्यादरम्यान अनिरुद्ध वीणाला घेऊन येतो आणि म्हणतो,"माझ्या नव्या बिझनेस पार्टनर आणि आशुतोषची बहिण वीणा". त्यावर अरुंधती आशुतोषला म्हणतेय,"आशुतोष माझं मन मला सांगतय...अनिरुद्ध वीणाचा वापर करत आपल्या घरात नवं वादळ आणण्याचा प्रयत्न करतोय". आता वीणाच्या येण्याने कोणतं नवं वादळ येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा



Khupte Tithe Gupte : लेदरची मोजडी, खादीचा कुर्ता अन् वागण्यात रुबाब; 'खुपते तिथे गुप्ते'च्या पहिल्या भागात हजेरी लावणार राज ठाकरे!


Raj Thackeray In Khupte Tithe Gupte : लोकप्रिय गायक, दिग्दर्शक आणि निर्माता असलेला अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमांचं नवं पर्व लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात राज ठाकरे (Raj Thackeray) हजेरी लावणार आहेत. 


'खुप्ते तिथे गुप्ते'ची घोषणा झाल्यापासून या कार्यक्रमाच्या नव्या पर्वासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता या नव्या पर्वाच्या पहिल्या भागात महाराष्ट्राचं मोठं व्यक्तिमत्त्व असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजेरी लावणार आहेत. नुकतचं या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा