Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत आता नवा ट्वीस्ट आला आहे. आता या मालिकेत आशुतोषच्या बहिणीची एन्ट्री होणार आहे. वीणा ही अनिरुद्धची बिझनेस पार्टनर आहे. त्यामुळे संजना आणि अनिरुद्धच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे.
ईशा आणि अनिशच्या साखरपुड्यादरम्यान अनिरुद्ध वीणाला घेऊन येतो आणि म्हणतो,"माझ्या नव्या बिझनेस पार्टनर आणि आशुतोषची बहिण वीणा". त्यावर अरुंधती आशुतोषला म्हणतेय,"आशुतोष माझं मन मला सांगतय...अनिरुद्ध वीणाचा वापर करत आपल्या घरात नवं वादळ आणण्याचा प्रयत्न करतोय". आता वीणाच्या येण्याने कोणतं नवं वादळ येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
अरुंधती, संजनानंतर अनिरुद्ध आता वीणाच्या मागे लागलेला दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अनिरुद्ध आजोबा आता तिसऱ्यांदा लग्न करणार? अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मालिकेतील या नव्या ट्वीस्टला नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे या ट्वीस्टमुळे मालिकाप्रेमींना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
वीणा नेमकी कोण आहे? तिची मालिकेत एन्ट्री कोणत्या कारणासाठी होत आहे याबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. वीणा म्हणजे आशुतोषची आत्ये बहिण. आई-वडिलांचं लहानपणीच निधन झाल्यानंतर आशुतोषच्या आई-बाबांनी तिचा संभाळ केला. वीणा खूप मोकळ्या मनाची आहे. तिला प्रवासाची आवड आहे. कोणत्याही गोष्टीत अडकून रहाणं तिच्या तत्वात बसत नाही. म्हणूनच एक दिवस निरोपाची चिठ्ठी देऊन वीणा आशुतोषच्या घरातून निघून गेली. वीणाच्या जाण्याने सर्वांनाच वाईट वाटलं. वीणाचे खुशालीचे फोन येत असत. आता इतक्या वर्षांनंतर वीणा पुन्हा एकदा येत आहे.
अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्यात बरीच उलथापालथ घडणार
अभिनेत्री खुशबू तावडे वीणा ही भूमिका साकारणार असून आई कुठे काय करते मालिकेच्या कुटुंबात सामील होण्यासाठी ती खुपच उत्सुक आहे. या भूमिकेविषयी सांगताना वीणा म्हणाली,"आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. या लोकप्रिय मालिकेचा भाग होताना आनंद होत आहे. वीणाच्या येण्याने अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्यात बरीच उलथापालथ घडणार आहे. त्यामुळे 'आई कुठे काय करते' मालिकेचे यापुढील भाग आणखी उत्कंठावर्धक होतील".
संबंधित बातम्या