Khupte Tithe Gupte : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाची गणना होते. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून हा कार्यक्रम चर्चेत आहे. तसेच हा कार्यक्रम कधी सुरू होणार याचीदेखील चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. तर येत्या 4 जूनपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा एक प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) म्हणत आहे,"ही खूर्ची देशाचं भविष्य घडवते, ही निर्दोषांना न्याय मिळवून देते, ही मानसाचा जीव वाचवते आणि ही खूर्ची प्रश्न विचारते, हिच्या प्रश्नांनाही धार आहे. खूर्चीवर बसायला कोण कोण तयार आहे? आता खूपणार नाही तर टोचणार".
'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्हाला काय वाटतं..या खुर्चीवर कोण कोण बसणार? 'खुपते तिथे गुप्ते' 4 जूनपासून दर रविवारी रात्री 9 वाजता, असं म्हणत या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचं नवं पर्व 10 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अनेक गुपिते उलगडली जाणार आहे. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवधूत गुप्ते खुपणारी गोष्ट बेमालूमपणे व खुबीने समोर आणणार आहे. 'खुपते तिथे गुप्ते'चं हे पर्व वेगळं असणार आहे. या पर्वाचं खास आकर्षण एक खास खुर्ची असणार आहे. या खुर्चीसाठी सगळीकडे चढाओढ पाहायला मिळणार आहे. नोकरदार, कॉर्पोरेट आणि राजकारणी मंडळींमध्ये खुर्चीसाठीची ही चढाओढ पाहायला मिळणार आहे.
'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' घेणार प्रेक्षकांचा निरोप
'खुप्ते तिथे गुप्ते' हा कार्यक्रम सुरू होत असल्याने 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या काही दिवसांत या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. वेगळं कथानक असूनही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस न उतरल्याने निर्मात्यांनी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या