Tuzech Mi Geet Gaat Aahe: तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेमध्ये एक मोठा ट्वीस्ट आला आहे. या मालिकेमधील स्वराज ऊर्फ स्वराचा आवाज परत आला आहे. गेली कित्येक दिवस स्वराला बोलताना येत नव्हतं आता स्वराला बोलता येत असल्यानं मल्हारला आनंद झाला आहे. आवाज परत आल्यानंतर स्वराजनं मल्हारला सर्व सत्य सांगितलं आहे. स्वरा ही वैदेहीची मुलगी आहे, हे आता मल्हारला कळालं आहे. हे ऐकून मल्हार आश्चर्यचकित झाला आहे.
तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, स्वराला ही तिचा आवाज परत आल्यामुळे आनंद झाला आहे. स्वारा मल्हारला म्हणते, 'मी वैदेहीची मुलगी आहे आणि हा नोकर नसून माझा मामा आहे.' हे ऐकल्यानंतर मल्हार आश्चर्यचकित होते. पण मोनिका मात्र चिडते. मोनिका मल्हारला विचारते, 'आपल्या घरात एवढे दिवस मुलगा म्हणून राहणारी ही मुलगी वैदेहीची मुलगी आहे का? मला तुझ्याकडून सत्य ऐकायचे आहे.' यावर मल्हार म्हणतो, 'हो मोनिका हे खरं आहे.' त्यानंतर मोनिका बंदुक आणते आणि स्वराला गोळी मारण्याचा प्रयत्न करते. आता हे स्वाराला पडलेलं स्वप्न आहे की खरंच असं घडलं आहे? हे प्रेक्षकांना या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये समजेल.
पाहा प्रोमो:
'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत (Tuzech Mi Geet Gaat Aahe) मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर हा साकारतो तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. तसेच या मालिकेमध्ये मोनिका मल्हार कामत ही भूमिका प्रिया मराठे ही साकारते. या मालिकेतील मंजुळा ही भूमिका देखील ऊर्मिला कानेटकर साकारते. 'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: