एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Telly Masala: राणादा आता गाजवणार रुपेरी पडदा ते ऐश्वर्या-अविनाश नारकर यांची प्यारवाली लव्हस्टोरी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Hardeek Joshi : राणादा आता गाजवणार रुपेरी पडदा; हार्दिक जोशीच्या 'क्लब 52'चा टीझर आऊट

Hardeek Joshi New Project Club 52 Movie Teaser Out : हार्दिक जोशी (Hardeek Joshi) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. 'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala) आणि 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकांच्या माध्यमातून हार्दिक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका चांगलीच गाजली. आजही राणादा म्हणून तो घराघरांत ओळखला जातो. पण प्रेक्षकांचा लाडका राणादा आता रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. हार्दिक जोशी 'क्लब 52' (Club 52) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aishwarya-Avinash Narkar : रब ने बना दी जोडी...ऐश्वर्या-अविनाश नारकर यांची प्यारवाली लव्हस्टोरी

Aishwarya Narkar Avinash Narkar Lovestory : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अविनाश नारकर (Avinash Narkar) या जोडीने मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. प्रेक्षकांची ही आवडती जोडी आहे. गेल्या काही दिवसांपासून रिल्समुळे ते चर्चेत आहेत. त्यांचे रिल्स व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे चाहत्यांना आता त्यांची लव्हस्टोरी जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"

मुंबई : अभिनेते अविनाश नारकर (Avinash Narkar) हे सध्या चांगलेच चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील (Social Media) त्यांच्या रील्स तुफान व्हायरल होत असल्याचं चित्र सध्या आहे. दरम्यान त्यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) या देखील अशाच रिल्समुळे चर्चेत आहेत. आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर या जोडप्याने केलेला व्हिडीओ हा तुफान व्हायरल झाला होता. तोच आता अविनाश नारकर यांचा याच गाण्यावरील दुसरा व्हिडीओची सध्या चर्चा रंगू लागीलेय. दरम्यान आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर अविनाश नारकर हे आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर पुन्हा एकदा थिरकले असल्याचं पाहायला मिळालं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Sankarshan Karhade: "माझ्या आयुष्यातला हा फार गोड क्षण…"; संकर्षणनं शेअर केली खास पोस्ट

Sankarshan Karhade:  अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade)  हा नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. संकर्षण हा सध्या त्याच्या नियम व अटी लागू (Niyam Va Ati Lagu) या नाटकाचे प्रयोग परदेशात करत आहे.  नियम व अटी लागू या नाटकाच्या अमेरिकेतील प्रयोगानंतर आलेल्या अनुभवाबद्दल संकर्षणनं एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. त्याच्या या स्पेशल पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Rinku Rajguru: "हर हर महादेव"; रिंकू राजगुरु पोहोचली केदारनाथला, शेअर केले फोटो

Rinku Rajguru: अभिनेत्री रिंकू राजगुरु ही सोशल मीडियावर तिच्या विविध लूक्समधील फोटो शेअर करत असते. रिंकूच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. अनेक नेटकरी रिंकूच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्स करत असतात. रिंकूनं नुकतेच केदारनाथ येथील काही फोटो शेअर केले आहेत. रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती केदारनाथच्या मंदिराबाहेर उभी राहिलेली दिसत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget