Man Jhala Bajind : 'मन झालं बाजिंद'... कृष्णा आणि रायाची जोडी रविवारी प्रेक्षकांच्या भेटीला, रंगणार एक तासाचा विशेष भाग
Man Jhala Bajind : 'मन झालं बाजींद' या मालिकेचा येत्या रविवारी एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे.
Man Jhala Bajind : प्रेक्षकांचं मनोरंजन हे आठवड्यातील काही वारांपुरतेच मर्यादित राहिले नसून आता प्रेक्षकांना अविरत मनोरंजनाची हमी मिळते आहे. येत्या रविवारी छोट्या पडद्यावर मोठ्या जल्लोषात 2022 या नवीन वर्षाचं स्वागत करण्यात येणार आहे. 'मन झालं बाजींद' या मालिकेचा महाएपिसोड प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
'मन झालं बाजिंद' या मालिकेवर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. कृष्णा आणि रायाची जोडीदेखील प्रेक्षकांची आवडती जोडी बनली आहे. मात्र मालिकेत आता एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. गुरुजींनी सांगितलेलं भाकीत अखेर खरं ठरणार आहे.
View this post on Instagram
राया आणि कृष्णाचा फुलांचा हार घातलेला फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये म्हटले आहे, गुरुजींनी सांगितलेलं भाकीत अखेर खरं ठरणार आहे. त्यामुळे आता राया आणि कृष्णाचा मृत्यू होणार आहे का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मालिकेत लवकरच मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
'जल्लोष 2022' हा खास कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. संगीतमय आणि विनोदाने भरलेली नवीन वर्षातील संध्याकाळ प्रेक्षकांचा ताण दूर करून त्यांचं भरभरून मनोरंजन करणार आहे.