Majhi Tujhi Reshimgath : परी नव्या बाबाचा स्वीकार करणार? यश नेहाच्या नात्यात सिम्मी-मिनाक्षीची लुडबुड
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत यश आणि नेहाचं नातं बहरताना दिसत आहे.
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) मालिकेत यश आणि नेहाचं नातं बहरताना दिसत आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये आपल्या दोघींमध्ये तिसरं कोणी नको असे परी म्हणताना दिसत आहे.
दुसरीकडे यश आणि नेहाचं नातं बहरताना सिम्मी आणि मिनाक्षी लुडबुड करत आहेत. नेहा यशची होणारी बायको म्हणून चौधरींच्या पॅलेसवर गेल्यावर सिम्मी आणि मिनाक्षीने तिचे चांगलेच स्वागत केले आहे. यश आणि नेहाला त्रास देण्याचा हा सिम्मीचा प्लॅन आहे. त्यामुळेच ती नेहासोबत गोड-गोड बोलताना दिसत आहे.
View this post on Instagram
श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
संबंधित बातम्या
Man Udu Udu Zhala : देशपांडे सरांसमोर येणार कार्तिक-सानिकाच्या लग्नाचं सत्य
Runway 34 Motion Poster : अजय देवगण आणि बिग बींच्या 'रनवे 34' सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज, ईदच्या मुहूर्तावर होणार प्रदर्शित
Black Panther Director Arrested : गलतीसे मिस्टेक! बँक दरोड्याच्या आरोपाखाली ‘ब्लॅक पँथर’च्या दिग्दर्शकाला आधी अटक, मग सुटकाही! नेमकं काय झालं?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha