एक्स्प्लोर
'कुमकुम भाग्य'च्या सेटवर अभिनेत्री विवाना सिंह जखमी
झी टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'कुमकुम भाग्य'मधील अभिनेत्री विवाना सिंह ही दुखापतग्रस्त झाली आहे.

मुंबई : झी टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'कुमकुम भाग्य'मधील अभिनेत्री विवाना सिंह ही दुखापतग्रस्त झाली आहे. या मालिकेत विवाना ही निगेटीव्ह भूमिका साकारत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विवानाची दुखापत गंभीर आहे. शूटींगदरम्यान, सेटवर विवानाच्या पायावर एक पेंटिंग पडल्याने तिच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर विवानाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, या घटनेनंतर विवाना म्हणाली की, 'मी सध्या ठीक आहे. बालाजी टीमचे आभार मानते. माझी परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी मला आराम करण्याची परवानगी दिली. तसंच सेटवर उशिरा येण्याची परवानगीही त्यांनी मला दिली. सुरुवातीला मला पायावर उभंही राहता येत नव्हतं. पण आता माझा पाय पूर्वीपेक्षा बरा आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























