KBC 16 Today Question : KBC मध्ये नाव नोंदणीसाठी विचारला 10 वा प्रश्न, भल्याभल्यांना घाम फुटला; जाणून घ्या उत्तर
KBC 16 Today Question : 'केबीसी 16'च्या रजिस्ट्रेशनला आता सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना विविध प्रश्न विचारले जात आहेत. तुम्हालाही या क्विज शोमध्ये सहभागी व्हायचं असेल तर या प्रश्नांची उत्तरे नक्की द्या.
KBC 16 Today Question : 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचं नवं पर्व अर्थात 'कौन बनेगा करोडपती 16' (KBC 16) सध्या चांगलच चर्चेत आहे. या कार्यक्रमात सहभागी होणारे अनेक स्पर्धक कोट्याधीश होऊनच या कार्यक्रमातून बाहेर पडतात. तर दुसरीकडे काही स्पर्धकांचं स्वप्न मात्र अपूर्णच राहतं. 'केबीसी 16' लवकरच सुरू होणार आहे. निर्मात्यांनी या कार्यक्रमाच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेला आता सुरुवात केली आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात एक प्रश्न विचारण्यात आला आहे.
'KBC'च्या रजिस्ट्रेशनला सुरुवात
'केबीसी 16'च्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रियेत आतापर्यंत 10 प्रश्न विचारण्यात आले आहेत. आज 10 वा प्रश्न विचारण्यात आला. रजिस्ट्रेशनमध्ये विचारण्यात आलेला दहावा प्रश्न क्रिडाविश्वासंबंधित आहे. तुम्हाला खेळाची आवड असेल तर या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या. या प्रश्नाचं उत्तर देता आलं तर या खेळात तुम्हाला या खेळात सहभागी होण्याची संधी मिळेल. जाणून घ्या 10 वा प्रश्न काय आहे.
काय आहे प्रश्न?
प्रश्न : रुद्राक्ष पाटील, तिलोत्तमा सेन आणि अखिल श्योराण नामक भारतीय खेळाड कोणत्या खेळात 2024 मध्ये पॅरिस ऑलंपिकसाठी क्वालीफाय झाले होते?
ऑप्शन्स :
A : निशानेबाजी
B : मुक्केबाजी
C : कुस्ती
D : तिरंजाजी
याप्रश्नाचं अचूक उत्तर 'A निशानेबाजी' असं आहे.
View this post on Instagram
अचूक उत्तर कसं पाठवाल?
केबीसीमध्ये विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचं उत्तर इच्छूक स्पर्धकांना व्हॉट्सअॅप आणि एसएमएसच्या माध्यमातून पाठवता येऊ शकतं. व्हॉट्सअॅपवरील 8591975331 या नंबरवर KBC असं लिहून प्रेक्षकांना हा उत्तर पाठवता येईल. तसेच एसएमएसच्या माध्यमातूनही ते रजिस्ट्रेशन करू शकतात. यासाठी स्पर्धकांना मॅसेज बॉक्समध्ये KBC उत्तराचा पर्यात (A/B/C/D) आणि लिंग (M/F/O) लिहावं लागेल. 5667711 या नंबरवर प्रेक्षकांना अचूक उत्तर पाठवता येईल. तसेच सोनी लिव्हवरदेखील त्यांना उत्तर पाठवता येईल. 'कोन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आजही देशभरात या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ आहे.
संबंधित बातम्या