Bollywood Actress : वडिलांकडे फी भरायला पैसे नव्हते, गरिबीत गेलं बालपण, आज 485 कोटी रुपयांची मालकीण आहे 'ही' अभिनेत्री
Bollywood Actress : फोटोत दिसणाऱ्या लहान मुलीचा जन्म एका फिल्मी कुटुंबात झाला असला तरी बालपणी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये (Bollywood) नवोदित कलाकारांसह अनेक स्टारकिड आहेत. नवोदित कलाकारांप्रमाणे स्टार किडलाही स्वत:ला सिद्ध करावं लागतं. स्टार किड चांदीचा चमचा घेऊन जन्माला झाला आणि त्याला संघर्ष करावा लागला नाही, असं म्हटलं जातं. फोटोत दिसणारी चिमुकली मुलगीदेखील बॉलिवूडच्या एका सुपरस्टार फिल्मी कुटुंबातील आहे. अभिनेत्री आज बी-टाउनची टॉप अभिनेत्री आहे. अभिनेत्रीला बालपणीत खूप अडचणींचा सामना करावा लागला आहे. अभिनेत्याच्या वडिलांकडे तिची फी भरायलाही पैसे नव्हते. पण आजच्या घडीला अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण आहे.
करीना कपूर (Kareena Kapoor) बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. करीनाने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेले आहेत. अभिनेत्रीने बी-टाउनवर राज्य केलं आहे. करीना कपूर एकदा म्हणाली होती,"सुपरस्टार्स कुटुंबात जन्मलेली करिना आणि तिची बहीण करिश्मा कपूरचा सांभाळ बबीता कपूरने केला आहे. सर्वसामान्य लोकांप्रमाणे त्यावेळी करीना पब्लिक ट्रान्सपोर्टचा अवलंब करायची. एकेकाळी तिच्या कुटुंबियांना ड्रायव्हरचे पैसेही देता येत नव्हते.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत 2011 मध्ये करीना कपूरला प्रश्न विचारण्यात आला होता की, रणबीर कपूरप्रमाणे लग्झरी कुटुंबात तुझा जन्म झालाय असं तुला वाटत होतं का?". त्यावेळी उत्तर देत करीना कपूर म्हणाली होती,"आम्ही लग्झरी आयुष्य जगलेलो नाही. माझी आई आणि बहिणीने मला उत्तम आयुष्य देण्यासाठी वास्तवमध्ये संघर्ष केला आहे. सर्व गोष्टी माझ्यासाठी लिमिटेड होत्या. लोलो म्हणजेच करिश्मा लोकल ट्रेनमधून कॉलेजला जायची. तर मी स्कूल बसने शाळेत जायचे. आमच्याकडे एक कार असली तरी ड्रायव्हरला देण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी आईने चांगले संस्कार केल्यामुळे आज प्रत्येक गोष्टीचं महत्त्व कळतं. अनुभवांमुळे मी माणूस म्हणून समृद्ध झाले आहे".
कपिल शर्माच्या कार्यक३मात रणधीर कपूर करिश्मा कपूरसोबत सहभागी झाले होते. त्यावेळी रणधीर कपूर म्हणाले होते की,"करिश्मा आणि करीनाची ट्यूशन फी भरण्यासाठीही माझ्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी पैसे कमावण्यासाठी मी खूप मेहनत घेतली.
करीना आज कोट्यवधींची मालकीण!
करीना कपूरला बालपणी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असला तरी आज ती कोट्यवधींची मालकीण आहे. सीएनबीसी टीव्ही 18 च्या रिपोर्टनुसार, करीना कपूर खानची एकूण संपत्ती 485 कोटी रुपयांच्या आसपास आहे. करीना आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी 10-12 कोटी रुपये चार्ज करते. तर प्रत्येक जाहिरातीसाठी ती 5 कोटी रुपये आकारते. करीना महिन्याला 1.5 रोटी रुपये कमावते. तर वर्षाला 12 कोटी रुपये कमावते. करीना कपूर सैफ अली खानसोबत लग्नबंधनात अडकली आहे.
संबंधित बातम्या