Kangana Ranaut : ओटीटी नाही तर छोट्या पडद्यावर पाहता येणार कंगनाचा 'लॉक अप 2'; यंदा कोण होणार कैद?
Kangana Ranaut : कंगना रनौतच्या 'लॉक अप' या लोकप्रिय कार्यक्रमाचं दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Kangana Ranaut : बॉलिवूडची 'पंगाक्वीन' अर्थात कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'लॉक अप' (Lock Upp) या लोकप्रिय कार्यक्रमाचं दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यामातून कंगनाने ओटीटी विश्वात पाऊल ठेवलं होतं. 'लॉक अप' च्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाल्याने आता या कार्यक्रमाचं दुसरं पर्व (Lock Upp 2) छोट्या पडद्यावर प्रसारित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
'लॉक अप' हा वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे. एकता कपूर (Ekta Kapoor) या कार्यक्रमाची निर्माती असून तिने आता हा कार्यक्रम आता छोट्या पडद्यावर प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. झी टीव्हीवर हा कार्यक्रम प्रसारित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. श्वेता तिवारीच्या 'मैं हूं अप्राजिता' या मालिकेची जागा आता कंगना रनौतचा 'लॉक अप 2' हा कार्यक्रम घेणार आहे.
View this post on Instagram
राखी सावंतची होणार 'लॉक अप 2'मध्ये एन्ट्री!
कंगना रनौतच्या 'लॉक अप 2' मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. टीआरपीच्या शर्यतीत अव्वल येण्यासाठी छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कलाकरांना या कार्यक्रमासाठी विचारणा झाल्याचे म्हटले जात आहे. यात ड्रामाक्वीन राखी सावंत, करण पटेल, आसिम रियाज आणि पारस छाबडाचा समावेश आहे.
'लॉक अप 2'मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना 72 दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक सिक्रेट्स शेअर करावे लागणार आहे. आधी हा कार्यक्रम Alt Balaji आणि Mx Player वर प्रेक्षक पाहू शकत होते. पण आता छोट्या पडद्यावर झी टीव्हीवर प्रेक्षक हा वादग्रस्त कार्यक्रम पाहू शकतात.
कंगनाचा 'लॉक अप 2' कधी सुरू होणार?
कंगना रनौतचा 'लॉक अप 2'ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. अद्याप निर्मात्यांनी हा कार्यक्रम कधीपासून प्रसारित होणार हे जाहीर केलेलं नाही. पण हा कार्यक्रम येत्या 7 एप्रिलपासून संध्याकाळी सात वाजता प्रेक्षकांना झी टीव्हीवर पाहता येईल असे म्हटले जात आहे. 'लॉक अप 2'च्या विजेत्याला लाखो रुपयांसह खास भेटवस्तूदेखील मिळणार आहेत.
संबंधित बातम्या