Jui Gadkari: ‘डिरेक्टर्स बॉक्स’; अभिनेत्री जुई गडकरीने दिग्दर्शकांना दिली अनोखी भेट
‘ठरलं तर मग’ (Tharla Tar Mag) मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांच्यासाठी जुईने सेटवर एक खास खाऊचा डबा आणला आहे. या खाऊच्या डब्याला ‘डिरेक्टर्स बॉक्स’ असं हटके नावही तिने दिलं आहे.
Jui Gadkari: स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘ठरलं तर मग’ (Tharla Tar Mag) मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. अर्जुन आणि सायली ही नवी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. मालिकेच्या माध्यमातून कलाकार घराघरात पोहोचतात. मात्र या कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात तंत्रज्ञांसोबतच महत्त्वाची व्यक्ती असते आणि ती म्हणजे दिग्दर्शक. पडद्यामागे राहून सारी सूत्र हलवणारा हा अवलिया क्वचितच प्रेक्षकांसमोर येतो.
मालिकेला खऱ्या अर्थाने दिशा देणाऱ्या या दिग्दर्शकाविषयी वाटणारी आपुलकी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी अभिनेत्री जुई गडकरीने एक अनोखा मार्ग शोधला. ठरलं तर मग मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांच्यासाठी जुईने सेटवर एक खास खाऊचा डबा आणला आहे. या खाऊच्या डब्याला ‘डिरेक्टर्स बॉक्स’ असं हटके नावही तिने दिलं आहे. सेटवर जुई दररोज नवनवे पदार्थ खाण्यासाठी घेऊन येत असते. दिग्दर्शक सचिन गोखले यांच्यासाठी आणलेल्या या खाऊच्या डब्यातील खाऊ संपणार नाही याकडे जुईचं आवर्जून लक्ष असतं.
कलाकार मंडळी दिवसाचे बारा-तेरा तास शूटिंग करत असतात. मालिकेचा सेट आणि सहकलाकार हेच त्यांचं नवं कुटुंब होऊन जातं. जुईच्या या अनोख्या उपक्रमाचं दिग्दर्शक सचिन गोखले यांनीही कौतुक केलं आहे. पडद्यामागची अशीच धमाल आणि मालिकेतलं नवं वळण अनुभवण्यासाठी पाहायला विसरु नका ठरलं तर मग मालिका.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: