Entertainment News Live Updates 13 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Golden Globes 2023: RRR चित्रपटाचा जगात डंका
मुंबई: केवळ भारतातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातलेल्या एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. आरआरआर चित्रपटाचं मानाच्या गोल्डन ग्लोब (Golden Globes2023 Nomination ) पुरस्कारासाठी नामांकन झालं आहे. बेस्ट फॉरेन फिल्म आणि बेस्ट ओरिजनल साँग या दोन प्रकारात आरआरआर चित्रपटाचे नामांकन झालं आहे. हे नामांकन नॉन इंग्लिश चित्रपटाच्या प्रकारात झालं असून आरआरआर या चित्रपटासोबत इतर चार चित्रपट या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत.
Nora Fatehi Files Defamation: जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात नोरा फतेहीने दाखल केला मानहानीचा दावा
Nora Fatehi Files Defamation: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही गेल्या काही दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) हिने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. नोराने तिच्या याचिकेत जॅकलिनने तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
Bamboo: ‘बांबू’ चित्रपटाचा टीझर रिलीज
Bamboo: खरंतर प्रेमात पडलेल्यानंतर आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींचा आनुभव अनेकांनी घेतला असेल. प्रत्येकानेच घेतला असेल. तुमचे गेलेले प्रेम यु टर्न मारून परत येण्यासाठी प्रेमाचे सायन्स पाळणे खूप गरजेचे आहे. ‘बांबू’ (Bamboo) चित्रपटाचे टीझर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून येत्या 26 जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत, तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्मित, विशाल देवरूखकर दिग्दर्शित ‘बांबू’च्या टीझरमध्ये तरूण -तरूणी बांबूच्या बनातून जाताना दिसत आहेत. अंबर विनोद हडप लिखित या चित्रपटात कलाकार नेमके कोण आहेत, हे जाणून घेण्याची आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.
Pitchers-2 चा ट्रेलर प्रदर्शित; नवीन कस्तुरिया अन् अभिषेक बॅनर्जी प्रमुख भूमिकेत
Pitchers S2 Trailer: ओटीटीवरील विविध विषयांवर आधारित वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळते. काही वेब सीरिजच्या पहिल्या सीझन प्रमाणेच दुसऱ्या सिझनला देखील प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देतात. नुकत्याच एका वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनची घोषणा झाली. या सीरिजचं नाव पिचर्स(Pitchers) असं आहे. पिचर्स (Pitchers-2) सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजच्या दुसऱ्या सिझनचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादव विरोधात तक्रार दाखल
Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवच्या (Rajpal Yadav) अडचणीत वाढ झाली आहे. शूटिंगदरम्यान राजपालने विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Uttar Pradesh | A student, Balaji, has filed a complaint against Actor Rajpal Yadav at Colonelganj PS, Prayagraj, accusing the actor of hitting him with a scooter. Actor Rajpal Yadav has also filed a complaint against the student for creating hindrances during film shooting.
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 12, 2022
Urmila Kothare : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान उर्मिला कोठारेची पोस्ट चर्चेत
Urmila Kothare : मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) आणि आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) यांच्यात बिनसलं असून ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. आता या चर्चांदरम्यान उर्मिला कोठारेच्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
View this post on Instagram
लव्ह रंजनच्या नव्या चित्रपटाची घोषणा; TJMM चा फुल फॉर्म काय? चाहते कोड्यात
TJMM: दिग्दर्शक लव्ह रंजन हा त्याच्या कॉमेडी आणि लव्ह स्टोरीवर आधारित चित्रटांमुळे ओळखा जातो. लवकरच त्याचा TJMM हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर लव्ह रंजननं सोशल मीडियावर शेअर केलं.
And the title is……
— Luv Films (@LuvFilms) December 13, 2022
Guess Karo ??? 😜#RanbirKapoor @ShraddhaKapoor @luv_ranjan #AnshulSharma #RahulMody @gargankur #BhushanKumar @TSeries pic.twitter.com/SvbtM0dgMM
Ved Trailer Out : 'वेड' तुझ्यातही आहे आणि माझ्यातही; रितेश-जेनिलियाच्या 'Ved'चा ट्रेलर आऊट
Riteish Genelia Ved Movie : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनिलिया देशमुखच्या (Genelia Deshmukh) बहुचर्चित 'वेड' (Ved) सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. या ट्रेलरमध्ये रितेश आणि जेनिलियाचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. या सिनेमात प्रेक्षकांना श्रावणी आणि सत्याच्या अनोख्या प्रेमाची गोष्ट पाहायला मिळणार आहे.