Jivachi Hotiya Kahili : विद्याधर जोशी आणि अतुल काळे यांच्यात प्रेक्षकांना बघायला मिळणार ऑनस्क्रीन चुरसदार भांडण!
Jivachi Hotiya Kahili : 'जिवाची होतिया काहिली' या मालिकेत प्रेक्षकांना विद्याधर जोशी आणि अतुल काळे यांच्यातील ऑनस्क्रीन भांडण पाहायला मिळणार आहे.
Jivachi Hotiya Kahili : 'जिवाची होतिया काहिली' (Jivachi Hotiya Kahili) ही नवी मालिका 18 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना नवी कोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. मराठी आणि कानडी यांच्यातल्या प्रेमावर भाष्य करणारी ही मालिका आहे. या मालिकेत दोन दिग्गज अभिनेते आमनेसामने असणार आहेत. असस्ल कोल्हापुरी वेशात अभिनेते विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi) तर त्यांच्यावर कानडी तडका द्यायला अभिनेते अतुल काळे (Atul Kale) असणार आहेत.
'जिवाची होतिया काहिली' या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्याच झलकमध्ये प्रेमाला भाषा नसते हे दिसलं तर कानडी आणि मराठीचा झकास तडका दुसऱ्यावेळेस बघायला मिळाला. मालिकेचं आकर्षण ठरलेत नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे गोन अनुभवी कलाकार म्हणजेच विद्याधर जोशी आणि अतुल काळे. विद्याधर जोशी यांचा अस्सल कोल्हापुरी वेश आणि अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
View this post on Instagram
कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे. आणि त्यातही त्यांच्यातलं होणारं चुरसदार भांडण आणि घरातल्या घरातच मारली जाणारी सीमारेषा प्रेक्षकांना आवाक करते आहे. हे भांडण रेवथी आणि अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम करेल, या कलाकारांचं ऑनस्क्रीन चुरसदार भांडण, उडणारे खटके आणि त्यांचा स्वतःचा असा एक भाषेचा ठसका प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही. या दोघांमुळे रेवथी आणि अर्जुन यांची प्रेमकहाणी कोणतं नवं वळण घेणार ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे. या मालिकेत या दिग्गज कलाकरांबरोबर अभिनेत्री सीमा देशमुख आणि भारती पाटील यादेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.
18 जुलैपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
विद्याधर जोशी आणि अतुल काळे यांच्या जोडगोळीचं ऑन स्क्रीन चुरसदार भांडण प्रेक्षकांना 18 जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. 18 जुलैपासून सोम.-शनि. संध्याकाळी साडे सात वाजता सोनी मराठीवर प्रेक्षकांना ही मालिका पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या