Jhalak Dikhhla Jaa 11 Winner : मनीषा रानी ठरली 'झलक दिखला जा 11'ची विजेती! ट्रॉफीसह मिळाले लाखो रुपये; विजेतेपद पटकावल्यानंतर म्हणाली,"वडिलांपेक्षा जास्त चाहत्यांवर विश्वास"
Jhalak Dikhhla Jaa 11 Winner Manisha Rani : 'झलक दिखला जा 11' या लोकप्रिय कार्यक्रमाची विजेती बिहारची मनीषा रानी ठरली आहे.
Jhalak Dikhla Jaa 11 Winner : 'झलक दिखला जा 11' (Jhalak Dikhla Jaa 11) या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शोचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला. गेले काही महिने या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. बिहारची मनीषा रानी (Manisha Rani) या कार्यक्रमाची विजेती ठरली आहे.
मनीषा रानीने शोएब इब्राहिम आणि अद्रिजा सिन्हाला मागे टाकत 'झलक दिखला जा 11'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. विजेतेपद पटकावल्यानंतर तिला ट्रॉफीसह 30 लाख रुपये मिळाले आहेत. 'झलक दिखला जा 11'च्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये मनीषा रानी, शोएब इब्राहिम, अद्रिजा सिन्हा, श्रीराम चंद्रा आणि धनश्री वर्मा या स्पर्धकांचा समावेश होता.
वडिलांपेक्षा जास्त चाहत्यांवर विश्वास : मनीषा रानी
'झलक दिखला जा 11'चं विजेतेपद पटकावल्यानंतर मनीषा रानी म्हणाली,"माझा माझ्या वडिलांपेक्षा चाहत्यांवर जास्त विश्वास आहे. चाहत्यांनीच मला जिंकवलं आहे. त्यामुळे हा पुरस्कार चाहत्यांचा आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे मनापासून आभार". मनीषा रानीने विजेतेपद पटकावल्यानंतर तिचा कोरिओग्राफर आशुतोष पवार भावूक झाला होता. मनीषा या कार्यक्रमाची विजेती ठरली यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. त्यानंतर त्यानेही चाहत्यांचे आभार मानले.
View this post on Instagram
मनीषाने आपल्या नृत्याने सर्वांनाच वेड लावलं आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. मनीषाचे ग्रँड फिनाले दरम्यानचे फोटो व्हायरल होत असून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.'झलक दिखला जा 11'च्या परिक्षणाची धुरा मलायका अरोरा, फराह खान आणि अरशद वारसी यांनी सांभाळली. तर ऋत्विक धनजानी आणि गौहर खान यांनी हा कार्यक्रम होस्ट केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिव ठाकरे, संगीता फोगाट, श्रीराम चंद्रा, तनीषा मुखर्जी, अंजली आनंद, राजीव ठाकूर, करुणा पांडे, उर्वशी ढोलकिया आणि आमिर अली बतौरसह अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.
फिनालेला 'मर्डर मुबारक'च्या स्टारकास्टची हजेरी
'झलक दिखला जा 11'च्या महाअंतिम सोहळ्यात 'मर्डर मुबारक'च्या स्टारकास्टने हजेरी लावली होती. विजय वर्मा, सारा अली खान आणि संजय कपूरसह अनेक मंडळी उपस्थित होते. आता या थरार नाट्य असणाऱ्या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 15 मार्च 2024 रोजी हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या