![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Jai Jai Swami Samarth : स्वामी भक्ताला राम रूपात दर्शन देणार; 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेचा रंगणार विशेष भाग
Jai Jai Swami Samarth : 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेचा विशेष भाग रंगणार आहे. स्वामी समर्थ भक्ताला राम रुपात दर्शन देणार आहेत.
![Jai Jai Swami Samarth : स्वामी भक्ताला राम रूपात दर्शन देणार; 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेचा रंगणार विशेष भाग Jai Jai Swami Samarth Marathi Serial Latest Update Swami will give darshan to form of Ram A special episode of the serial will be aired Know Television Entertainment Latest Update Jai Jai Swami Samarth : स्वामी भक्ताला राम रूपात दर्शन देणार; 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेचा रंगणार विशेष भाग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/20/2792b73552fb62ce20e28e0d339a841d1705727514578254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jai Jai Swami Samarth : 'जय जय स्वामी समर्थ' (Jai Jai Swami Samarth) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. ही पौराणिक मालिका असून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल ठरली आहे. आता या मालिकेत नवा ट्वीस्ट येणार आहे. मालिकेच्या आगामी भागात स्वामी समर्थ भक्ताला राम रुपात दर्शन देणार आहेत. 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेचा विशेष भाग रंगणार आहे.
'जय जय स्वामी समर्थ' या लोकप्रिय मालिकेत नेहमीच स्वामींच्या अनेक लीला पाहायला मिळतात. “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असे म्हणत स्वामी नेहमी आपल्या भक्तांना धीर देतात आणि प्रत्येक संकटातून वाचवतात. मालिकेत आतापर्यंत आपल्याला स्वामींचे अनेक रुपात दर्शन घडले आहे. 21 जानेवारीच्या विशेष भागात प्रेक्षकांना अनोखी लीला पाहायला मिळणार आहे. यात स्वामी भक्ताला राम रूपात दर्शन देणार आहेत.
'जय जय स्वामी समर्थ' मालिकेच्या आगामी भागात काय पाहायला मिळणार?
रत्नाकर ने अवघं आयुष्य खर्ची घालून तीन फूटी राममूर्ती आकाराला घातली आहे. त्याच्या शेतातील एका झाडाखाली त्याला या मूर्तीची स्थापना करायची आहे. हेच
त्याच्या आयुष्याचं ध्येय आहे. आणि आता ते ध्येय पूर्ण होणार म्हणून तो अत्यानंदित आहे. रत्नाकरची पत्नी कौमुदी स्वामी भक्त आहे. तिची इच्छा आहे की प्रतिष्ठापनेच्या आधी रत्नाकर ने स्वामींना मूर्ती दाखवावी. पण रामाव्यतिरीक्त इतर कुणालाही न मानणारा रत्नाकर ते साफ नाकारतो.
View this post on Instagram
रत्नाकरने इकडे मूर्ती स्थापनेचा एक शुभ मुहूर्त काढला आहे. पण त्याच दरम्यान एका सरदाराची नजर त्या राममूर्तीवर पडते आणि तो जबरदस्तीने मूर्तीचं हरण करतो. आपलं आयुष्यभराचं स्वप्न भंगलं या विचाराने रत्नाकर पूर्ण खचतो. कौमुदी आता स्वामींना शरण जाते. त्यानंतर मालिकेत वेगळं वळण येतं.
'जय जय स्वामी समर्थ' मालिकेचा रंगणार विशेष भाग
'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. आता या मालिकेचा विशेष भाग रंगणार आहे. या विशेष भागात स्वामी समर्थ राम रुपात दर्शन देणार आहेत. 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेचा विशेष भाग येत्या रविवारी 21 जानेवारी दुपारी 2 आणि रात्री 8 वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
संबंधित बातम्या
Jai Jai Swami Samarth : 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत भक्ताला मिळणार जीवनदान!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)