Jahnavi Killekar : छोट्या पडद्यावरील खलनायिकेची बिग बॉसच्या घरात एन्ट्री, जान्हवी किल्लेकर काय नवा डाव टाकणार?
Who is Jahnavi Killekar : 'भाग्य दिले तू मला' फेम अभिनेत्रीची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे. जान्हवी किल्लेकर काय नवा डाव टाकणार हे पाहावं लागणार आहे.
मुंबई : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच प्रसिद्ध कार्यक्रम बिग बॉस मराठीच्या नवीन पाचव्या सीझनला आजपासून सुरुवात झाली आहे. यंदा बिग बॉस मराठीचा होस्ट रितेश देशमुख असणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. छोट्या पडद्यावरील खलनायक अभिनेत्रीची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे. बिग बॉस मराठीच्या घरात आजपासून ड्रामा सुरु झालेला पाहायला मिळणार आहे.
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठीच्या घरात
भाग्य दिले तू मला टीव्ही मालिका फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल झाली आहे.
आता होणार कल्ला असं म्हणत बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धक म्हणून जान्हवी किल्लेकरच्या नावाची चर्चा सुरु होती. आता ती स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहे.
'भाग्य दिले तू मला' फेम अभिनेत्री बिग बॉसच्या घरात
View this post on Instagram
कोण आहे जान्हवी किल्लेकर? (Who is Jahnavi Killekar)
'कोलीवाडा झिंगला' म्युझिक अल्बमधून अभिनेत्री जान्हवी किल्लेकर लोकप्रिय झाली. त्यानंतर जान्हवी 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतून घराघरांत पोहोचली. या मालिकेत ती खलनायकाच्या भूमिकेत दिसली.
View this post on Instagram
'हे' कलाकार बिग बॉसच्या घरात
बिग बॉसच्या घरात अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, पंढीरानाथ कांबळे उर्फ पॅडी, अभिजीत सावंत यांनी एन्ट्री घेतली आहे. दरम्यान एन्ट्रीच्या वेळी स्पर्धकांना दोन पर्याय देण्यात आले. बिग बॉसची करन्सी किंवा एक पावर कार्ड असा ऑप्शन देण्यात आलाय. त्यामध्ये अनेकांनी पॉवर कार्डची निवड केली तर काहींनी करन्सी घेतली. त्यामुळे आता खेळात चांगलीच रंगत येणार असल्याचं पाहायला मिळतंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :