Ishita Dutta And Vatsal Sheth: इशिता-वत्सल झाले आई-बाबा; लग्नाच्या सहा वर्षानंतर अभिनेत्रीनं दिला मुलाला जन्म
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण इशिता आणि वत्सल यांना शुभेच्छा देत आहेत.
Ishita Dutta And Vatsal Sheth: अभिनेत्री इशिता दत्ता (Ishita Dutta) आणि अभिनेता वत्सल सेठ (Vatsal Sheth) यांच्या घरी एका पाहुण्याचे आगमन झाले आहे. इशितानं बुधवारी (19 जुलै) एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सेलिब्रिटी आणि चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून इशिता आणि वत्सल यांना शुभेच्छा देत आहेत.
एका रिपोर्टनुसार, इशिता ही सध्या रुग्णालयात आहे. शुक्रवारी (21 जुलै) त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. इशितानं मंगळवारी (18 जुलै) इंस्टाग्रामवर तिचा एक सेल्फी शेअर केला होता. या सेल्फीला तिनं कॅप्शन दिलं, 'शेवटचा महिना कठिण आहे.'
इशिता आणि वत्सल यांनी 31 मार्च रोजी प्रेग्नेंसीची घोषणा केली होती.इशिता आणि वत्सल यांनी मॅटरनिटी फोटोशूट देखील केले होते. ज्यामध्ये इशितानं तिचं बेबी बंप फ्लॉन्ट केलं. इशितानं तिच्या बेबी शॉवरचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.
View this post on Instagram
इशिता दत्ता आणि वत्सल सेठ यांनी 28 नोव्हेंबर 2017 रोजी लग्नगाठ बांधली. 'रिश्तों का सौदागर-बाजीगर' या टीव्ही शोमध्ये काम करताना इशिता आणि वत्सल यांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. इशिता दत्ता आणि वत्सल सेठ हे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.
वत्सल सेठनं ये रिश्ते हैं प्यार के या मालिकेमध्ये निशांत माहेश्वरी ही भूमिका साकारली होती. त्यानं 'एक हसीना थी', 'हासील' आणि 'रिश्तों का सौदागर-बाजीगर' यांसारख्या शोमध्ये प्रमुख भूमिका साकारली . वत्सलनं नागिन या सीरिअलमध्ये देखील काम केलं आहे.
अभिनेत्री इशिता दत्ता दृश्यम् 2 या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिनं अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती. इशितानं बेपनाह प्यार,कौन है? - एक नया अध्याय या मालिकांमध्ये देखील काम केलं.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
सहकलाकाराला थप्पड लगावल्यानंतर इशिता दत्त ढसाढसा रडली