एक्स्प्लोर

Imlie : 'इमली' मालिकेच्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने लाईटमनचा मृत्यू

Imlie Serial : 'इमली' मालिकेच्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने लाईटमनचा मृत्यू झाला आहे.

Imlie Serial Electrocuted Labourer Died : एकीकडे गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) जल्लोषात साजरा होत आहे. तर दुसरीकडे 'इमली' (Imlie) या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने लाईटमनचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव महेंद्र यादव असं आहे. अद्याप मालिकेच्या टीमने किंवा चॅनले यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. 

स्टार्स प्लसवरील 'इमली' (Imlie) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण आता या मालिकेच्या सेटवर एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये फिल्मसिटीमध्ये या मालिकेचं शूटिंग सुरू होतं. दरम्यान लाईटमनला विजेचा धक्का लागला. त्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण रुग्णवाहिकेतच त्याचा मृत्यू झाला. 

'इमली' (Imlie) मालिकेच्या सेटवर मृत्यू झालेल्या लाईटमनचे नाव महेंद्र यादव (Mahendra Yadav) असे आहे. गेल्या काही दिवसांपासून तो या मालिकेचं शूटिंग करत होता. 28 वर्षीय महेंद्रला काही दिवसांपूर्वीदेखील विजेचा धक्का लागला होता. त्यानंतर 19 सप्टेंबरला त्याला पुन्हा एकदा विजेचा धक्का लागला आणि त्याने निधन झाले. 

लाईटमनच्या निधनाने 'इमली' मालिकेच्या शूटिंगला ब्रेक

महेंद्र यादव (Mahendra Yadav) या लाईटमनच्या निधनाने 'इमली' मालिकेचं शूटिंग थांबलं होतं. महेंद्रला विजेचा धक्का कुठे आणि कसा लागला हे अद्याप समोर आलेलं नाही. महेंद्र यादव याने 'इमली' या मालिकेआधीही अनेक मालिकांसाठी लाईटमन म्हणून काम केलं आहे. 'इमली' या मालिकेसह अनेक सिनेमाचं आणि मालिकांचं शूटिंगही फिल्मसिटीमध्ये होतं. 520 एकरमध्ये पसरलेल्या फिल्मसिटीमध्ये जवळपास 16 स्टुडिओ आणि 42 आऊटडोअर शूटिंग लोकेशन्स आहेत. 

'इमली' मालिकेबद्दल जाणून घ्या... (Imlie Serial Details)

'इमली' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. फोर लायन्स फिल्म अंतर्गत गुल खान यांनी 'इमली' या मालिकेची निर्मिती केली आहे. या मालिकेत अद्रिजा रॉय आणि केतन राव मुख्य भूमिकेत आहे. रोमँटिक नाट्य असणारी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यातील पगडंडिया गावातील एका 18 वर्षीय मुलीची गोष्ट प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळत आहे. आता मालिकेच्या आगामी भागांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या मालिकेतील लव्हस्टोरीचं प्रचंड कौतुक होत आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका पहिल्या पाचमध्ये आहे.

संबंधित बातम्या

Made In India : मेड इन इंडिया! 'RRR'च्या यशानंतर एसएस राजामौलींनी केली नव्या सिनेमाची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani Somnath Suryawanshi Case | सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून 50 लाखांचे आमिषABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 05 January 2025Job Majha | सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात निम्न श्रेणी लिपिक पदावर भरती ABP MajhaVIDEO |  100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Embed widget