(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathi Serial : 'नवीन करण्याच्या नादात काहीही करत सुटलेत...,' झी मराठीच्या नव्या 'इच्छाधारी नागीण'मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले
Marathi Serial : झी मराठीवर लवकरच इच्छाधारी नागिन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण या मालिकेवर प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं चित्र सध्या आहे.
Marathi Serial : मागच्या काही काळामध्ये झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर अनेक नव्या मालिकांची सुरुवात झाली. येत्या काळातही लक्ष्मीनिवास ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी एकत्र दिसणार आहेत. असं असतानाच झी मराठीकडून पुन्हा एकदा नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. 'इच्छाधारी नागीण'(Iccha Dhari Nagin) असं या मालिकेचं नावं आहे. पण या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचं चित्र आहे.
झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच जगधात्री आणि तुला जपणार आहे या मालिकांची घोषणा करण्यात आली होती. पण अद्यापही या मालिकेविषयी कोणतेही अपडेट्स समोर आलेले नाहीत. त्यातच आता पुन्हा एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आलीये. त्यामुळे झी मराठीवर लवकरच नव्या मालिकांची सुरुवात होणार असल्याचं चित्र सध्या आहे.
इच्छाधारी नागीण मलिकेची घोषणा
इच्छाधारी नागीण मालिकेची घोषणा नुकतीच झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन करण्यात आलीये. सोशल मीडियावर मालिकेची झलक दाखवणारा प्रोमो शेअर करण्यात आलाय. हा प्रोमो शेअर करत झी मराठीने म्हटलं की, येतेय 'इच्छाधारी नागीण' लवकरच आपल्या झी मराठीवर! त्यामुळे आता या मालिकेत कोणते कलाकार झळकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षक संतापले
दरम्यान या मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. नाव ऐकूनच बघायची इच्छा निघून गेली... झी मराठीची वाट लावून ठेवलीये पूर्ण, झी मराठीच हे चॅनल का पाहू नये याची कारणं देतंय. काहीतरी नवीन करण्याच्या नादात काहीही करत सुटलेत... खरंच झी मराठी शब्द नाहीत या नव्या मालिकेसाठी...ह्या अशा मालिकेमुळे आहेत प्रेक्षक ते पण पाठ फिरवतील... हेच बाकी होतं, झी मराठी आपण किती अधोगती करु शकतो, ह्याचं जीवंत उदाहरण आहे हे चॅनल...नाही नको...असलं काहीही नको झी मराठीवर...झी मराठीकडून अशी अपेक्षा नव्हती...बास्स…एवढंच बघायचं राहिलेलं! आता आपण सगळे मरायला मोकळे, अशा आशयाच्या कमेंट्स या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Ashok Saraf : अशोक सराफांचा गौरव, नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित