एक्स्प्लोर
मुस्लीम असल्याने अभिनेत्रीला मुंबईत घर मिळण्यास अडचण
शिरीन मिर्झा स्टार प्लसच्या 'ये है मोहब्बतें' मालिकेत सिम्मी ही निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारत आहे.
मुंबई : एकता कपूरची सुपरहिट मालिका 'ये है मोहब्बतें'मध्ये दिव्यांका त्रिपाठीच्या नणंदेची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिरीन मिर्झा सध्या फारच अडचणीत आहे. मुंबईत राहण्यासाठी घर मिळत नसल्याने ती वैतागली आहे.
अभिनेत्रीने तिचं दु:ख फेसबुकवर शेअर केलं आहे. तिने लिहिलं आहे की, "मी मुंबईत एक घर घेण्याच्या लायक नाही, त्याचं कारण आहे माझं 'एमबीए' असणं. ह्या एमबीएचा अर्थ 'मुस्लीम, बॅचलर, अॅक्टर.' तिने एक फोटोही शेअर केला, जो तिच्या सुरुवातीच्या दिवसाचा आहे. "करिअरच्या सुरुवातीला मी मुंबईला आले होते, तेव्हाचा हा फोटो आहे. आज सुमारे आठ वर्ष झाली. मी काय मिळवलं..."
"मी मद्यपान करत नाही, धुम्रपान करत नाही. माझी गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मग इतर लोक व्यवसायावरुन माझ्या चारित्र्यबाबत मत बनवू शकतात. दुसरी गोष्टी मी जेव्हा ब्रोकरला फोन करते, तेव्हा मी एकटी असल्याचं समजल्यानंतर ते भाडं वाढवतात. कारण विवाहित नसल्याने मला घर मिळणार नाही, असं सांगण्यात येतं. तर दुसऱ्या ब्रोकरला कॉल केल्यावर तो विचारतो, मी हिंदू आहे की मुस्लीम."
"आज एवढी वर्ष झाली तरी माझा संघर्ष सुरु आहे. मी इथे खूप काही मिळवलं आहे. मला एकच प्रश्न विचारायचा आहे की, इतकी वर्ष झाल्यानंतर आणि यश मिळवल्यानंतरही मी मुंबईची रहिवाशी आहे की नाही?"
शिरीन मिर्झा स्टार प्लसच्या 'ये है मोहब्बतें' मालिकेत सिम्मी ही निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
बीड
भारत
Advertisement