एक्स्प्लोर
हे राम... नथुराम... नाटकाच्या प्रयोगाला औरंगाबादमध्ये विरोध
![हे राम... नथुराम... नाटकाच्या प्रयोगाला औरंगाबादमध्ये विरोध Hay Ram Naturams Oppose On Sambhaji Briged Swabhimani Sanghtna हे राम... नथुराम... नाटकाच्या प्रयोगाला औरंगाबादमध्ये विरोध](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/21112938/aurangabad-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
औरंगाबाद: 'हे राम... नथुराम...!'नाटकाच्या प्रयोगाला कोकणानंतर मराठवाड्यातही विरोध होत आहे. आज औरंगाबादमध्ये या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाटकाला विरोध करणाऱ्या स्वाभिमानी आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी चोप दिला आहे.
औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवासेनेच्या वतीने 'हे राम...नथुराम...!' नाटकाचे आयोजन संत तुकाराम नाटयगृह एन – 5 सिडको येथे करण्यात आलं होतं. यावेळी स्वाभिमान आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी विरोध कऱण्यास सुरुवात केली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी त्यांच्या समर्थकांह संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना चोप दिला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोकणातील कणकवलीमध्येही 'हे राम...नथुराम...!'च्या प्रयोगाला स्थानिक आमदार नितेश राणे यांनी विरोध केला होता. यावर संतप्त झालेल्या नाटकाचे लेखक आणि निर्माते शरद पोंक्षे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला होता.
संबंधित बातम्या
'हे राम... नथुराम...!'च्या प्रयोगाला नितेश राणेंचा विरोध, शरद पोंक्षेंचा फेसबुकवर संताप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)