एक्स्प्लोर

Happy Birthday Dipika Kakkar : एअर होस्टेस ते अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास, लग्नासाठी धर्म बदलल्याने नेहमीच चर्चेत राहिली दीपिका कक्कर!

Deepika Kakkar Birthday : ‘ससुराल सिमर का’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेतून घरांघरात आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री दीपिका कक्कर आज (6 ऑगस्ट) तिचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे.

Deepika Kakkar Birthday : ‘ससुराल सिमर का’ (Sasural Simar Ka) या लोकप्रिय टीव्ही मालिकेतून घरांघरात आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakkar) आज (6 ऑगस्ट) तिचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे. दीपिका कक्करने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. पण, व्यावसायिक आयुष्यापेक्षा दीपिका अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. दीपिका अनेकदा सोशल मीडियावर पती शोएब इब्राहिमसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते, जे व्हायरल होतात.

टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री दीपिका कक्कर लग्नासाठी धर्म बदलल्यामुळे प्रचंड चर्चेत आली होती. या वेळी तिच्यावर जोरदार टीका देखील झाली होती. मात्र, कुण्याच्याही टीकेकडे लक्ष न देता दीपिकाने आपल्या प्रेमाची साथ दिली.

एअर होस्टेस ते अभिनेत्री!

अभिनेत्री दीपिका कक्कर हिचा जन्म 6 ऑगस्ट 1986 रोजी पुण्यात झाला. दीपिकाने मुंबई विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. यानंतर तिने एअर होस्टेस बनण्याचे प्रशिक्षण घेतले. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने जेट एअरवेजमध्ये 3 वर्षे एअर होस्टेस म्हणून कामही केले. मात्र, नंतर तब्येतीच्या कुरबुरीमुळे तिने ही नोकरी सोडली आणि मनोरंजन विश्वात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.

मालिकांमधून केली करिअरची सुरुवात

दीपिकाने मनोरंजन विश्वात प्रवेश केला, त्यावेळी तिचे लग्न झाले होते. दीपिका कक्करचे पहिले लग्न रौनक सॅमसनशी झाले होते, जो पायलट होता. मात्र, प्रेमविवाह असूनही हे नाते फार काळ टिकले नाही. दीपिकाने सुरुवातीला अनेक मालिकांमध्ये छोट्या भूमिका केल्या. तिने 2010 मध्‍ये 'नीर भरे तेरे नैना देवी' मधून आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात केली. यानंतर ती 'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो'मध्येही झळकली. मात्र, 2011मध्ये सुरु झालेल्या ‘ससुराल सिमर का’ या मालिकेने तिचे नशीब पालटले. या मालिकेत तिने ‘सिमर’ ही मुख्य भूमिका साकारली होती. दीपिकाने ‘बिग बॉस’ या शोचे विजेतेपदही पटकावले आहे.

दीपिकाला मिळाली शोएबची साथ

‘ससुराल सिमर का’ दरम्यान दीपिका आणि तिचा पहिला पती रौनक यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली होती. अनेकदा मालिकेच्या सेटवर देखील या दोघांचे वाद व्हायचे. या वादांना कंटाळून 2015मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. अशा कठीण प्रसंगात दीपिकाला साथ दिली ती तिच्या ऑनस्क्रीन पतीने अर्थात अभिनेता शोएब इब्राहिम याने. शोएब या मालिकेत दीपिकाच्या पतीची भूमिका साकारत होता. या शोदरम्यान दोघेही चांगले मित्र बनले होते. शोएबने दीपिकाला वाईट काळात साथ दिली. दरम्यान दोघांमध्ये प्रेम फुलू लागले.

बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका आणि शोएबने 2018मध्ये मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न केले. लग्न करण्यासाठी दीपिकाने इस्लाम धर्म स्वीकारला होता. यावेळी तिने तिचे नाव बदलून फैजा केले. मात्र, आजही सगळे तिला दीपिका या नावानेच ओळखतात.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 6 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Happy Birthday Aditya Narayan : लहान वयातच गायली 100हून अधिक गाणी, अभिनयातही आजमावलं नशीब! वाचा आदित्य नारायणबद्दल..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
VIDEO Sudhir Mungantiwar : माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana | मुलांच्या खात्यात पैसे आले, लाडक्या बहिणीनं केले परत Special ReportSantosh Deshmukh Case | बीड संतोष देशमुख हत्याकांड काय घडलं, कसं घडलं? Special ReportSudhir Mungantiwar Majha Katta | मंत्रिपद कुणामुळे गेलं, रोख कुणाकडे, मुनगंटीवार 'माझा कट्टा'वरSantosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्येवरून सर्वपक्षीय एल्गार, धनंजय मुंडेंवर वार ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
VIDEO Sudhir Mungantiwar : माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
Embed widget