Guru Purnima 2022 : मराठी मालिकांचा रंगणार गुरुपौर्णिमा विशेष भाग; 13 जुलैला प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी
Marathi Serial : मराठी मालिकांचा सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून आता मालिकेत गुरुपौर्णिमा विशेष भाग पाहायला मिळणार आहे.
![Guru Purnima 2022 : मराठी मालिकांचा रंगणार गुरुपौर्णिमा विशेष भाग; 13 जुलैला प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी Guru Purnima 2022 Special episode of Marathi series Ranganar Guru Purnima 2022 A feast of entertainment for the audience on 13 July Guru Purnima 2022 : मराठी मालिकांचा रंगणार गुरुपौर्णिमा विशेष भाग; 13 जुलैला प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/11/98a521a218b877995de0c0693eba3f461657539171_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Guru Purnima 2022 : गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म .... भक्ताला परमेश्वराची ओळख गुरूमुळेचे होते. त्यामुळे परमेश्वर आणि गुरू यांपैकी आधी नमस्कार कुणाला करावा हा प्रश्नं नेहेमीच पडत असतो. गुरुच्या थोरवीचे काही शब्दांत वर्णन करता येणे अशक्यच ! गुरू-अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात. आता 13 जुलैला प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. मराठी मालिकांचा (Marathi Serial) गुरुपौर्णिमा विशेष भाग रंगणार आहे.
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, या पृथ्वीतलावर परमेश्वर येऊ शकत नाही त्यामुळेच या वाट चुकलेल्या भक्तांना मार्ग दाखविण्यासाठी त्यांने अनेक रूपं धारण केली. अनेक पीडितांच्या दु:खांचे निवारण केले, वाट चुकलेल्यांना सदगुरूंनी मार्ग दाखविला. संपूर्ण महाराष्ट्रात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आजारी केली जाते. कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' आणि 'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेमध्येदेखील गुरुपौर्णिमा विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शिष्याच्या हाकेला साक्षात गुरुमाउली धावून येणार आहे. गुरुपौर्णिमा विशेष भाग 13 जुलै रोजी संध्याकाळी सात आणि रात्री आठ वाजता प्रेक्षक विशेष भाग पाहू शकतात.
View this post on Instagram
बाल शंकर महाराज मामाला दिव्य अमरनाथ दर्शन घडवून आणण्यात यशस्वी होणार
'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेमध्ये बाल शंकर यांना अनेक गोष्टींचा साक्षात्कार होताना दाखवण्यात आलं आहे. अनेक गरजूंना मदत करताना बघितलं आहे. अनेक चमत्कार आणि त्यांच्या अनेक बाल लीला बघितल्या आहेत. आता बाल शंकर महाराज त्यांच्या मामाची स्वप्नपूर्ती करण्यासाठी स्वामी समर्थांना साकड घालताना दिसणार आहेत. "स्वामी मी शब्द दिला आहे मामाला त्याचं अमरनाथचं दर्शन इथेच होईल म्हणून". बाल शंकर यांच्यासमोर देखील हे खूप मोठं आव्हान असणार आहे की, गावातील कपटी मार्तंड आणि त्याच्या टोळीचा कट मोडून काढून त्याच्या मामाची इच्छा पूर्ण करणे. आजवर त्यांनी मार्तंडचे अनेक डाव मोडीत काढले आहेत… बाल शंकर महाराज कसे त्यांच्या मामाला दिव्य अमरनाथ दर्शन घडवून आणण्यात यशस्वी होतील.
दुसरीकडे 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेमध्येदेखील गुरुपौर्णिमा विशेष भाग बघायला मिळणार आहे. स्वामींचे म्हणणे आहे, गुरुचरणी संपूर्ण श्रध्देने समर्पित झाल्यास सर्व काही शक्य असते. भक्ताच्या हाकेला साद घालत पुन्हा एकदा भक्ताचे तारणहार होणार आहेत. रामाचार्य स्वामी समर्थांना सर्वांसमोर हार मानण्यास सांगतात कारण कोणीएक श्रीकृष्ण मयतापाशी बसून त्याला उठवायचो म्हणतो आहे. स्वामी नक्कीच त्याच्या मदतीला धावून येतील असा त्याचा विश्वास आहे. स्वामींची लीला पुन्हाएकदा बघायला मिळणार आहे. तुळशीचे पान मयताच्या मुखात ठेवताच मृत माणूस पुन्हा एकदा उठून बसतो. हे सगळं कसे घडले? जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेला गुरुपौर्णिमा विशेष भाग पाहायला लागेल. 13 जुलैला रात्री आठ वाजता प्रेक्षक हा विशेष भाग पाहू शकतात.
संबंधित बातम्या
Mika Di Vohti : 'स्वयंवर मिका दी वोटी'मध्ये मिकाच्या एक्स गर्लफ्रेंडची वाइल्ड कार्ड एन्ट्री; कार्यक्रमाच्या टीआरपीत वाढ
Nava Gadi Nava Rajya : 'नवा गडी नवं राज्य' मालिकेतून अनिता दाते करणार पुनरागमन; दिसणार अतरंगी भूमिकेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)