Dnyanada Ramtirthkar: ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील ज्ञानदा रामतीर्थकरनं ट्रोलरला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, 'तुमच्या विचारांची...'
नुकताच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने (Dnyanada Ramtirthkar) तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं तिला ट्रोल केलं.
![Dnyanada Ramtirthkar: ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील ज्ञानदा रामतीर्थकरनं ट्रोलरला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, 'तुमच्या विचारांची...' dnyanada ramtirthakar get trolled for her outfit on social media actress give reply Dnyanada Ramtirthkar: ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील ज्ञानदा रामतीर्थकरनं ट्रोलरला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, 'तुमच्या विचारांची...'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/06/c6f43a6e27a78523a7cc104fb9aaee5e1688629205565259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dnyanada Ramtirthkar: सोशल मीडियावर सेलिब्रिटी विविध पोस्ट शेअर करत असतात. अनेकदा सेलिब्रिटी हे त्यांच्या विविध लूकमधील फोटो शेअर करतात. या फोटोला कमेंट करुन काही नेटकरी या सेलिब्रिटींचं कौतुक करतात.तर काही जण त्यांना ट्रोल करतात. नुकताच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने (Dnyanada Ramtirthkar) तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं तिला ट्रोल केलं. या ट्रोलरला ज्ञानदानं सडेतोड उत्तर दिलं आहे.
ज्ञानदानं शेअर केला फोटो
ज्ञानदा रामतीर्थकरनं तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये ती व्हाईट शॉर्ट्स आणि टी-शर्ट अशा लूकमध्ये दिसत आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'कोणीतरी मला 'कसाटा आईस्क्रीम' म्हटलं आहे आणि ते खूप योग्य आहे!जस्ट चिलिंग' ज्ञानदानं शेअर केलेल्या या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट करुन तिला ट्रोल केलं आहे.
नेटकऱ्याची कमेंट
ज्ञानदानं शेअर केलेल्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'कापड कमी पडलं वाटत'या कमेंटला ज्ञानदानं रिप्लाय दिला, 'नाही तुमच्या विचारांची पोच कमी पडली' ट्रोलरा ज्ञानदानं दिलेल्या या सडेतोड उत्तराचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
ज्ञानदा ही सध्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत ती अपूर्वा ही भूमिका साकारते. तसेच ज्ञानदानं सख्या रे, जिंदगी नॉट आउट, शतदा प्रेम करावे , इयर डाऊन या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ ज्ञानदा सोशल मीडियावर शेअर करत असते. या मालिकेत ज्ञानदासोबतच सारिका नवाथे, लीना भागवत, सुप्रिया पाठारे आणि चेतन वडनेरे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारतात. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
ज्ञानदा ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिला इन्स्टाग्रामवर 314K फॉलोवर्स आहेत. ज्ञानदाच्या सोशल मीडियावर पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. अनेक नेटकरी ज्ञानदाच्या पोस्टला लाइक आणि कमेंट करतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)