Aditya Srivastava and Dayanand Shetty : 'CID' तील अभिजीत आणि दयाचे कमबॅक; 'या' शोमध्ये आदित्य आणि दयाची जोडी पुन्हा एकदा झळकणार
Aditya Srivastava and Dayanand Shetty : छोट्या पडद्यावर अनेका वर्ष आपली हुकूमत गाजवणारी मालिका सीआयडीने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला होता. या मालिकेतील आदित्य श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी ही जोडगोळी पुन्हा एकदा झळकणार आहे.
Aditya Srivastava and Dayanand Shetty : छोट्या पडद्यावर अनेका वर्ष आपली हुकूमत गाजवणारी मालिका सीआयडीने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला. या मालिकेने जवळपास तीन दशके टीआरपीच नव्हे तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या मालिकेतील एसीपी प्रद्युमन, दया, अभिजीत, फ्रेडी, डॉक्टर साळुंखे अशा अनेक व्यक्तीरेखा लोकप्रिय आहेत. मालिका बंद झाल्याने प्रेक्षकांचा हिरमोड झाला होता. आता, मात्र या मालिकेतील आदित्य श्रीवास्तव (Aditya Srivastava) आणि दयानंद शेट्टी ( Dayanand Shetty) ही जोडगोळी पुन्हा एकदा झळकणार आहे.
'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, आदित्य श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी हे दोघेही कमबॅक करत आहेत. मात्र, हे दोघेही जुन्या व्यक्तीरेखेत दिसणार नाहीत. दयानंदने सांगितले की, आम्ही कमबॅक करत आहोत. पण, दया आणि अभिजित म्हणून परतणार नाही.
कोणत्या शोमध्ये झळकणार?
दयानंद आणि आदित्य छोट्या पडद्यावर कोणत्याही गुन्ह्याचा तपास करताना दिसणार नाहीत. आदित्यने सांगितले की, दया आणि मी मागील 20 वर्षांपासून गु्न्ह्यांच्या प्रकरणांची उकल करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, आता तसे होणार नाही. सीआयडीची जुनी टीम एका ट्रॅ्व्हल शोच्या माध्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्याने सांगितले.
View this post on Instagram
आम्ही मे महिन्यात हा शो युट्युबवर लाँच करण्याची तयारी करत आहोत. या शोमध्ये प्रवासातील गमतीजमती, गोष्टी, खाण-पिणं असा वेगवेगळा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. आम्ही याआधी साताऱ्यात जाऊन आलो असून आता गोव्याची वारी करणार असल्याचे आदित्य श्रीवास्तवने सांगितले.
एका चित्रपटात झळकणार
सीआयडीच्या टीमला पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत, याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळेच आम्ही हा नवा शो घेऊन आलो अल्याचे त्यांनी सांगितले. आता, आदित्य आणि दयानंद हे दोघेही एका चित्रपट झळकणार आहे. या चित्रपटातून आम्ही दोघेही एकत्रित काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच संपले असल्याचे आदित्यने सांगितले.