एक्स्प्लोर

Dinesh Phadnis: दिनेश फडनिस यांना हार्ट अटॅक आल्याची अफवा, CID मधील दयानं दिली हेल्थ अपडेट, म्हणाला, "ते व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत"

दिनेश फडनिस (Dinesh Phadnis) यांना हृदयविकाराचा झटका आला होता, अशी चर्चा झाली होती.  पण आता  सीआयडीमधील दया ही भूमिका साकारणारे अभिनेते दयानंद शेट्टी यांनी दिनेश यांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे.

Dinesh Phadnis:  छोट्या पडद्यावरील सीआयडी (CID) या प्रसिद्ध शोमध्ये फ्रेड्रिक्सची भूमिका साकारुन  विशेष लोकप्रियता मिळवलेले अभिनेते  दिनेश फडनिस (Dinesh Phadnis) यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली होती.  पण आता  सीआयडीमधील दया ही भूमिका साकारणारे अभिनेते दयानंद शेट्टी यांनी दिनेश यांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे. दयानंद यांनी दिनेश यांना हार्ट अटॅक आल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

दिनेश फडनिस यांना हार्ट अटॅक आल्याची अफवा (Dinesh Phandis Health Update)

इंडियन एक्स्प्रेसला दिनेश यांची हेल्थ अपडेट देताना दयानंद शेट्टी  म्हणाले, 'दिनेश फडनिस यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टर त्यांचे निरीक्षण करत आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही, त्याच्यावर वेगळ्या कारणांमुळे उपचार सुरू आहेत. यावर मी आत्ताच भाष्य करू इच्छित नाही."

रिपोर्टनुसार,  दिनेश फडनिस यांच्यावर तुंगा या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिनेश यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे.  त्यांना भेटण्यासाठी सीआयडी (CID) शोमधील कलाकार देखील रुग्णालयात गेले होते.

View this post on Instagram
 
A post shared by Dinesh Phadnis (@dineshphadnis)

दिनेश यांनी  सीआयडी या लोकप्रिय शोमध्ये त्याने इन्स्पेक्टर फ्रेड्रिक्सची भूमिका साकारली होती. या शोमधील त्यांच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. त्याने या शोमध्ये अनेक वर्षे काम केले. दिनेश यांची कॉमेडी चाहत्यांना आवडली होती. या शोमध्ये दयानंद शेट्टीने इन्स्पेक्टर दया ही भूमिका साकारली होती. 

दिनेश यांनी 'या' चित्रपटांमध्ये केलं काम

CID या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त दिनेश तारक मेहता का उल्टा चष्मामध्येही दिसला होता. या शोमध्ये एक छोटी भूमिका त्यांनी साकारली होती. त्याने आमिर खानच्या चित्रपटातही काम केले आहे. सरफरोश या चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका साकारली. दिनेश यांनी ‘भरला हा मालवत रक्त’ या मराठी चित्रपटातही काम केले आहे. हृतिक रोशनच्या 'सुपर 30' या सिनेमांतही ते झळकले.  त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि एखाद्या कलाकृतीच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला यावे अशी चाहत्यांची इच्छा आहे.

संबंधित बातम्या

CID चे इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडनिस  रुग्णालयात दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Nasim Khan Security : माझ्यावर हल्ला करण्याचा कट, नसीम खान यांचा दावाSudhir Mungantiwar : मुख्यमंत्री भाजपचाच असेल असं अमित शाहांनी कधीच म्हटलेलं नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget