एक्स्प्लोर

'चला हवा येऊ द्या'तील 'त्या' पात्रामुळे आगरी बांधव दुखावले

'चला हवा येऊ द्या'तील आगरी पात्रामुळे आपल्या समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेने केला आहे.

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय विनोदी मालिकेला पत्र लिहून तक्रार करण्यात आली आहे. कार्यक्रमातील आगरी पात्रामुळे आपल्या समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेने केला आहे. आगरी-कोळी समाजाची कार्यक्रमातून जाहीर माफी मागण्यासही या संघटनेने फर्मावलं आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या 5 आणि 6 नोव्हेंबर 2018 च्या कार्यक्रमातील 'दिवाळी पहाट'मध्ये विविध कवी, गायक अशी पात्रं दाखवली होती. त्यात आगरी कवी मिथुन भोईर उर्फ 'अधोक्षज' भोईरचे विनोदी पात्र दाखवले होते. मात्र आगरी समाजात हे नाव अत्यंत अभावाने आढळत असल्याचं पत्रात अॅड. भारद्वाज लक्ष्मण चौधरी यांनी म्हटलं आहे. आगरी पात्राद्वारे विनोद निर्मिती करणे गैर नाही. त्यासाठी आगरी बोलीभाषिक वैशिष्ट्याचा वापर करणेही चूक नाही. पण आगरी पात्राद्वारे आगरी समाजावर चुकीची टीका टिप्पणी करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असं आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेने बजावलं. पत्रात काय? आगरी माणूस हा भरभरुन दागिने घालतो, ती आमची परंपराच आहे, संस्कृती आहे. कोणी एक नाही तर सर्व समाजच भरभरुन दागदागिने घालतो! ते समाजाचेच वैशिष्ट्य असताना, त्यावर अशी टिप्पणी कशी केली जाऊ शकते ??? बरं, आगरी माणसाने स्व-कष्टाने रात्रन्-दिवस खपून आपल्या मीठ-शेती-रेतीतून हे मिळवले आहेत. त्याने कधी कोणाला लुटलेले नाही लुबाडलेले नाही. डाका घालायला तो काही दरोडेखोर नाही. सासऱ्याला लुबाडून-नडून, ते हुंड्यातूनसुद्धा मिळवलेले नाही. आगरी समाज कष्ट संघर्ष, मेहनत काही करीत नाही ? सतत दारुत टाईटच असतो ? जुगार खेळून त्याच्या हाती पैसा येतो ? म्हणजे हाच त्याचा कमवण्याचा उद्योग आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. येत्या आठवडाभरात जर आपण माझ्या समाजाचे असे विकृतीकरण करुन केलेल्या सादरीकरणामुळे दुखावल्या गेलेल्या भावनांमुळे जाहीर माफी मागावी, अन्यथा आपल्या संपूर्ण टीमला माझ्या समाजाच्या भडकलेल्या भावनांना सामोरे जावे लागेल आणि त्यामुळे जर काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी आपली असेल.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Nana Patekar Nephew Anirudh Patekar: 'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Raj Thackeray on Delhi CJP Protest: या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Embed widget