थुकरट वाडीत देशमुख कुटुंबियांनी लावली हजेरी; श्रेया- भाऊ सिड आणि अदितीच्या भूमिकेत
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मराठी शो चला हवा येऊ द्या गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील कलाकारांच्या विनोदी शैलीचा चाहता वर्ग मोठा आहे.
![थुकरट वाडीत देशमुख कुटुंबियांनी लावली हजेरी; श्रेया- भाऊ सिड आणि अदितीच्या भूमिकेत chala hawa yeu dya latest episode of team Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hawa थुकरट वाडीत देशमुख कुटुंबियांनी लावली हजेरी; श्रेया- भाऊ सिड आणि अदितीच्या भूमिकेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/16/2bba4533ba8fb0dc580236929090f9da_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tujhya Majhya Sansarala Aani Kay Hava : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मराठी शो चला हवा येऊ द्या गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील कलाकारांच्या विनोदी शैलीचा चाहता वर्ग मोठा आहे. निलेश साबळे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे श्रेया बुगडे, सागर कारंडे आणि कुशल बद्रिके ही चला हवा येऊ द्या ची टीम वेगवेगळे विनोदी स्किट सादर करत असते. वेगवेगळ्या नाटक, मालिका आणि चित्रपटांमधील कलाकार या शोमध्ये येत असतात. नुकतीच तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील कलाकरांनी या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी थुकरट वाडीत या मालिकेमधील देशमुख कुटुंबियांनी धमाल मस्ती केली.
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मलिकेतील सिड आणि आदितीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेत 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेतील राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी प्रमुख सिड ही भूमिका साकारत आहे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेतील हार्दिकच्या अभिनयाने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे. चला हवा येऊ द्या मधील सगळे विनोदवीर हे तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेवर एक विनोदी प्रहसन सादर करणार आहेत. सिड आणि अदितीच्या भूमिकेत श्रेया बुगडे आणि भाऊ कदम सगळ्यांना खळखळून हसवणार आहेत.
Ankita Lokhande : अंकिताची लगीनघाई, बॅचलर पार्टीची तयारी सुरु; या ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा
View this post on Instagram
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारलेली आहे. या मालिकेचे कथानक देशमुख कुटुंबियांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे. या मालिकेमध्ये आदिती ही भूमिका अभिनेत्री अमृता पवार साकारते. अमृताने जिजामाता या मालिकेमध्ये काम केले आहे. त्यानंतर ती ललित 205 या मालिकेत अभिनेता संग्राम साळवी सोबत दिसली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)